नवी दिल्ली : पाच जानेवारी रोजी लाँच झालेला लेनोवोच्या K4 नोटची विक्री १९ जानेवारीपासून सुरु केली जाणार आहे. अॅमेझॉन इंडियावर मोठ्या प्रमाणात या स्मार्टफोनसाठी रजिस्ट्रेशन करण्यात आलंय.
लाँच केल्यानंतर दोन दिवसांत दोन लाख लोकांनी फोनसाठी रजिस्ट्रेशन केल्याची माहिती कंपनीने दिलीये. कंपनीने या K4 नोट ची किंमत ११ हजार ९९९ रुपये इतकी ठेवलीये.
वाईब K4 नोटमध्ये ५.५ इंचाचा एचडी स्क्रीन आहे. यात ३ जीबी रॅम असून मीडियाटेक प्रोसेसर आहे. या स्मार्टफोनचा रेयर कॅमेरा १३ मेगापिक्सेल आणि फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सेल आहे. इंटरनल मेमरी १६ जीबी देण्यात आली असून १२८ जीबीपर्यंत एक्सपांडेबल आहे. यात ४जी, एलटीई, ए-जीपीएस, ब्लूटूथ ४.० हे ऑप्शन देण्यात आलेत. यात 3300mAh बॅटरी देण्यात आलीये.