२० MP कॅमेरा आणि 4GB रॅमसह एलजीचा जी प्रो ३ लवकरच लॉन्च

स्मार्टफोनच्या बाजारात आपली पकड मजबूत करण्यासाठी एलजी सतत प्रयत्न करतेय. गेल्या काही दिवसांपूर्वी G4 लॉन्चिंगमुळे LG G Pro ३चं लॉन्चिंग थांबवलं होतं. माज्ञ आता लवकरच एलजीचा जी प्रो ३ लॉन्च होणार असल्याचं कळतंय.

Updated: Jul 5, 2015, 05:36 PM IST
२० MP कॅमेरा आणि 4GB रॅमसह एलजीचा जी प्रो ३ लवकरच लॉन्च title=

मुंबई: स्मार्टफोनच्या बाजारात आपली पकड मजबूत करण्यासाठी एलजी सतत प्रयत्न करतेय. गेल्या काही दिवसांपूर्वी G4 लॉन्चिंगमुळे LG G Pro ३चं लॉन्चिंग थांबवलं होतं. माज्ञ आता लवकरच एलजीचा जी प्रो ३ लॉन्च होणार असल्याचं कळतंय.

मिळालेल्या माहितीनुसार कंपनी जी प्रो २चा उत्ताराधिकारी म्हणून जी प्रो ३ लॉन्च करण्याच्या तयारीला लागलीय. ६ इंचच्या या फॅबलेटचे काही फीचर्स लीक झाले आहेत, ज्यात फिंगरप्रिंट सेंसरचा पण समावेश आहे.

हे सेंसर फोनच्या मागील भागात कॅमेऱ्याखाली लागलं असेल. कंपनी फिंगरप्रिंट रिडिंगबाबत एक पाऊल पुढे टाकत यावेळी iris ची ओखळ क्षमता आणखी वाढवेल. मात्र मिळालेल्या माहितीनुसार कंपनीनं आता हे फीचर जी५ साठी सुरक्षित ठेवलंय.

हे फॅबलेट २०१५च्या अखेरीस लॉन्च होऊ शकतं. याची किंमत ५० हजार रुपयांच्या जवळपास असेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.