आज पर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन लॉन्च

इंटेक्स कंपनीने त्यांचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन इंटेक्स क्लाउड एफएक्स नुकताच विक्रीसाठी लॉन्च केला आहे.

Updated: Aug 25, 2014, 06:00 PM IST
आज पर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन लॉन्च title=

मुंबई : इंटेक्स कंपनीने त्यांचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन इंटेक्स क्लाउड एफएक्स नुकताच विक्रीसाठी लॉन्च केला आहे.

फायरफॉक्स ऑपरेटिंग सिस्टमवर चालणारा या स्मार्टफोनची किंमत आहे फक्त १९९९ रु.  या फोनची विक्री ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट स्नॅपडिलवर सुरू आहे. पण या फोनमध्ये व्हॉटस अॅपची सुविधा सध्या तरी उपलब्ध नाही.

इंटेक्स क्लाउड एफएक्सची वैशिष्ट्ये:
डिस्प्ले- ३.५ इंच, ३२०x४८० पिक्सल रेझ्युलेशन  
प्रोसेसर- १ गीगाहर्त्झ 
रॅम- १२८ एमबी 
कॅमेरा- २ मेगापिक्सल 
मेमरी- २५६ एमबी इंटरनल आणि ४ जीबी मायक्रो-एसडी कार्ड
बॅटरी- १२५० मेगाहर्ट्ज
जीपीआरएस, एडीजीई, वाय-फाय, ब्ल्यूटूथ 
किंमत- १९९९ रु.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.