नवी दिल्ली : भारतीय कंपनी मायक्रोमॅक्स लवकरच सर्वांत स्वस्त ड्युएल कोअर प्रोसेसर फोन 'बॉल्ट ए-064’ लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. या फोन अँन्ड्रॉईड 4.4.2 ऑपरेटिंग सिस्टम वापरण्यात आलंय.
'बॉल्ट ए-064’मध्ये 1.3 गीगाहर्टझं मीडिया टेक एमटी 6571 ड्युएल कोअर प्रोसेसर उपलब्ध आहे. तर या फोनमध्ये रिअर कॅमेरा २ मेगापिक्सलचा असून फ्लॅशचीही सुविधा देण्यात आलीय. फ्रंट कॅमेऱ्यात व्हीजीए देण्यात आलंय. तर दोन्ही कॅमेऱ्यांत फिक्स्ड फोकस दिला गेलाय.
माइक्रोमॅक्स ‘बॉल्ट A064’ची वैशिष्ट्यं...
• स्क्रीनः 3.5 इंच
• रिझोल्युशन : 480 X 320 पिक्सल
• ड्युएल सिम फोन
• रॅम : 512 एमबी
• मेमरी : 4 जीबी इंटरनल स्टॉअरेज आणि 32 जीबी मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट
• बॅटरी : 1400 एमएएच, 5 तासांचा टॉक टाईम
• ब्लू टूथ : 3.0
या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी २जी, वाय-फाय, जीपीएस उपलब्ध आहे. हा फोन दिसायला खूप सुंदर आहे. हा फोन माइक्रोमॅक्सच्या साईटवर उपलब्ध होईल. तसेच हा फोन रिटेलर्सकडेही उपलब्ध होईल. या फोनची किंमत असेल केवळ 3,278 रुपयांत ग्राहकांना उपलब्ध होईल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.