सनी लियॉनच्या समोर पंतप्रधान मोदींनीही टेकले हात

भारतात २०१४ सालात गुगलवर सगळ्यात जास्त सर्च झालेल्या आणि लोकप्रिय असणाऱ्या लोकांची यादी, नुकतीच जाहीर करण्यात आलीय.

Updated: Dec 17, 2014, 10:35 AM IST
सनी लियॉनच्या समोर पंतप्रधान मोदींनीही टेकले हात title=

मुंबई : भारतात २०१४ सालात गुगलवर सगळ्यात जास्त सर्च झालेल्या आणि लोकप्रिय असणाऱ्या लोकांची यादी, नुकतीच जाहीर करण्यात आलीय.
 
गूगल इंडियाच्या वार्षिक 'ईअर इन सर्च'नुसार २०१४ साली गुगलच्या सर्च इंजिनवर सगळ्यात जास्त केल्या जाणाऱ्या लोकप्रिय व्यक्तींच्या यादीत बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑन ही सध्या टॉपवर दिसतेय तर दुसऱ्या क्रमांकावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी... लोकप्रियतेच्या या यादीत सनी लिऑनने पंतप्रधान नरेंद्र मोदींना मागं टाकल्याचं यावरून दिसतंय. या

या यादीत सलमान खान त्याची एक्स गर्लफ्रेंड कतरीना कैफपेक्षा आघाडीवर आहे... या यादीत तिसऱ्या नंबरवर सलमान, चौथ्या क्रमांवकावर कतरीना तर पाचव्या क्रमांकावर आहे दीपिका पादूकोण....

क्रिकेटर्समध्ये विराट कोहलीनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरलाही मागे टाकलंय. सिनेमांच्या शीर्षकानुसार, बॉलिवूड थ्रिलर 'रागिनी एमएमएस २' या सिनेमाविषयी सर्वात जास्त सर्च करण्यात आलं.

तर, अभिनेता ऋतिक रोशन याच्या 'बँग बँग' या सिनेमाचं टायटल ट्रॅक आणि हनी सिंगचा 'ब्लू आईज' हे गाणं सर्वात जास्त वेळा सर्च करण्यात आलं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.