जीमेलवरुन करता येणार पैशांची देवाण-घेवाण

जीमेल वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मोबाईल फोनमधील जीमेल अॅपद्वारे लवकरच पैसे पाठवता आणि स्वीकारता येणार आहे. सध्या अमेरिकेत गुगलने हे नवीन फिचर आणलं आहे. लवकरच ती इतर देशांमध्ये ही सुरु होणार असल्याचं गूगलने सांगितलं आहे.

Updated: Mar 17, 2017, 04:31 PM IST
जीमेलवरुन करता येणार पैशांची देवाण-घेवाण title=

मुंबई : जीमेल वापरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मोबाईल फोनमधील जीमेल अॅपद्वारे लवकरच पैसे पाठवता आणि स्वीकारता येणार आहे. सध्या अमेरिकेत गुगलने हे नवीन फिचर आणलं आहे. लवकरच ती इतर देशांमध्ये ही सुरु होणार असल्याचं गूगलने सांगितलं आहे.

'फि-फ्री' नावाचं हे फिचर आहे. या जीमेल अॅपने फोटो किंवा फाईल पाठवली जाते तसेच आता पैसे देखील पाठवता येणार आहेत. पैसे हे तुम्हाला तुमच्या बँकेतही जमा करता येणार आहेत. ई-मेल पाठण्या इतकेच हे सोपे आहे.

जगभरात जवळपास 1 अब्ज लोकं गुगल वापरतात. त्यापैकी ७५ टक्के लोकं हे मोबाईल वरुन जीमेल अॅक्सेस करतात. जीमेलने काही वर्षांपूर्वी ऑनलाईन व्यवहारांसाठी गुगल वॅलेट हे फिचर आणले होते. पण फोनवरुन ते वापरता येत नसल्याने ते इतके प्रभावी ठरले नव्हते.

गुगलचे 75 टक्के युजर्स मोबाईल वरुन जीमेल वापरतात. जगभरातील ८० टक्के युजर्स अँड्रॉइड ऑपरेटींग सिस्टीम असलेले फोन वापरतात. त्यामुळे या नव्या फिचरचा जास्तीत जास्त लोकं वापर करतील अशी गुगलला अपेक्षा आहे.