हे सर्वाधिक वापरले जाणारे कॉमन पासवर्ड

पासवर्ड मॅनेजिंग किपर सेक्युरीटी या कंपनीने नुकतास जाहीर केलेल्या एका सर्वेक्षणात सांगितलं आहेत की 2016 या वर्षात कोणते पासवर्ड हे कॉमन होते. यामध्ये सर्वात जास्त वेळा 123456 हा पासवर्ड वापरण्यात आला आहे. 123456789 हा दुसऱ्या तर qwerty हा पासवर्ड तिसऱ्या स्थानावर होता. password, welcome, dragon, login,google, 1q2w3e4r5t हे पासवर्ड देखील अनेकांनी ठेवले होते.

Updated: Jan 15, 2017, 02:16 PM IST
हे सर्वाधिक वापरले जाणारे कॉमन पासवर्ड title=

नवी दिल्ली : पासवर्ड मॅनेजिंग किपर सेक्युरीटी या कंपनीने नुकतास जाहीर केलेल्या एका सर्वेक्षणात सांगितलं आहेत की 2016 या वर्षात कोणते पासवर्ड हे कॉमन होते. यामध्ये सर्वात जास्त वेळा 123456 हा पासवर्ड वापरण्यात आला आहे. 123456789 हा दुसऱ्या तर qwerty हा पासवर्ड तिसऱ्या स्थानावर होता. password, welcome, dragon, login,google, 1q2w3e4r5t हे पासवर्ड देखील अनेकांनी ठेवले होते.

कोणते पासवर्ड आहेत कॉमन

12345678, 1234567890, monkey, 111111, 98754321  हे कॉमन पासवर्डच्या यादीत सामाविष्ट आहेत. गेल्या वर्षी देखील काही कॉमन पासवर्ड लीक झाले होते. 

तुम्हाला तुमचा पासवर्ड सुरक्षित ठेवायचा असेल तर या २५ पैकी पासवर्डचा वापर करु नका. स्प्लॅशडेटाने आठ डिजीट तसेच त्यापेक्षा अधिक डिजीटचा पासवर्ड वापरण्यास सांगितलेय. तसेच पासवर्डमध्ये विविध कॅरेक्टरर्स जसे लेटर्स, नंबर्स आणि सिम्बॉलचा वापर करण्याच्या सूचना दिल्यात. 

गेल्या वर्षी लीक झालेले पासवर्ड

123456 , password , 12345678 , qwerty, 12345 , 123456789, football , 1234 , 1234567 , baseball , welcome, 1234567890, abc123, 111111, 1qaz2wsx, dragon, master, monkey, letmein, login , princess, qwertyuiop, solo, passw0rd, starwars