भेटा मानवाशी संवाद साधणाऱ्या रोबोला

आशियातील सर्वात मोठा तंत्रज्ञानाचा उत्सव अशी ओळख असलेल्या आयआयटी मुंबईच्या ` टेकफेस्ट `ला आज सुरुवात झाली. यावेळच्या फेस्टिवलचं सर्वात मोठं आकर्षण आहे ते मानवी भावना समजून घेणारा `` बीना४८ `` नावाचा रोबो.

Updated: Jan 3, 2014, 11:32 PM IST

www.zee24taas.com
आशियातील सर्वात मोठा तंत्रज्ञानाचा उत्सव अशी ओळख असलेल्या आयआयटी मुंबईच्या ` टेकफेस्ट `ला आज सुरुवात झाली. यावेळच्या फेस्टिवलचं सर्वात मोठं आकर्षण आहे ते मानवी भावना समजून घेणारा `` बीना४८ `` नावाचा रोबो.
हुबेहूब माणसासारखा दिसणारा आणि सहजरित्या संवाद साधणारा हा रोबो बघण्यासाठी एकच गर्दी झालीय.
आपण विचारलेल्या प्रश्नांना बिना - 48 अशा पद्धतीने अगदी सहज उत्तर देतो. Breakthrough Intelligence via Neural Architecture असं बिनाचं संक्षिप्त नाव. तर ४८ एक्झाफ्लॉप्स हे अक्षर बिनाची क्षमता सांगते. म्हणजेच एका सेंकंदात अब्जावधी आकडेमोड करण्याची क्षमता बिनामध्ये आहे.
बिना४८ या रोबोच्या या क्षमतेचा उपयोग मानवी भावना समजून घेणे आणि माणसाला त्याच शब्दात उत्तर देण्यासाठी करण्यात आलाय.
रजनीकांतच्या रोबो सिनेमात चिट्टी नावाच्या रोबोलो मानवी भावभावना असल्याचं दाखवण्यात आलं होतं. पण चिट्टी हा सिनेमातली कल्पनाविष्कार होता, तर बिना 48 हा वास्तवातला वैज्ञानिक चमत्कार आहे.
भविष्यात बहुतेक सर्वच ठिकाणी कामाची जागा रोबो घेणार आहेत. रोबो माणसाचा जवळचा मित्रही बनणार आहे. त्यामुळे आत्तापासून रोबोला भावभावना देण्याचा प्रयत्न सुरु आहे. बिना४८ हे चिट्टीचंच वर्तमान काळातील छोटं स्वरुप म्हणावं लागेल.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.