मुंबई पालिकेत प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी भरती

बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत क्षयरोग रुग्णालय समूहाच्या आस्थापनेवरील "प्रयोगशाळा सहाय्यक" या संवर्गातील सध्या रिक्त असलेली पदे भरण्यात येणार आहे. एकूण पाच पदे रिक्त आहेत.

Updated: Jul 26, 2014, 03:48 PM IST
 title=

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत क्षयरोग रुग्णालय समूहाच्या आस्थापनेवरील "प्रयोगशाळा सहाय्यक" या संवर्गातील सध्या रिक्त असलेली पदे भरण्यात येणार आहे. एकूण पाच पदे रिक्त आहेत.

खुल्या वर्गात ३ तर मागासवर्गीय गटात २ पदे भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी निवड प्रक्रियेसाठी वैद्यकीय अधीक्षक, क्षयरोग रुग्णालय समूह, जेरवाई वाडीया रोड, शिवडी, मुंबई -४०० ०१५ येथे उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. निवड प्रक्रियेसाठी खुल्या गटासाठी ३० जुलै २०१४ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत तर मागासवर्गीय गटासाठी ३० जुलैलाच दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत उपस्थित राहण्याचे कळविण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.