विद्यापीठांमध्ये आता गुणांऐवजी श्रेणीपद्धत

 विद्यापीठ अनुदान आयोगाने काही बदल करण्याचे संकेत दिले आहेत. यात देशभरातल्या विद्यापीठांमध्ये आता लवकरच गुणांऐवजी श्रेणीपद्धत लागू होणार आहे. पदवी अभ्यासक्रमांसाठी ही पद्धत लागू करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे अभ्यासक्रमही निवडण्याची मूभा देण्यात येणार आहे.

Updated: Jan 12, 2015, 11:23 AM IST
विद्यापीठांमध्ये आता गुणांऐवजी श्रेणीपद्धत title=

नवी दिल्ली :  विद्यापीठ अनुदान आयोगाने काही बदल करण्याचे संकेत दिले आहेत. यात देशभरातल्या विद्यापीठांमध्ये आता लवकरच गुणांऐवजी श्रेणीपद्धत लागू होणार आहे. पदवी अभ्यासक्रमांसाठी ही पद्धत लागू करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे अभ्यासक्रमही निवडण्याची मूभा देण्यात येणार आहे.
  
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं नुकत्याच झालेल्या बैठकीत या नव्या पद्धतीबाबत चर्चा करुन त्याला मंजुरी दिली आहे. २०१६ पासून ही नवी पद्धत लागू होईल अशी शक्यता आहे. त्यामुळं आता विद्यार्थ्य़ांच्या गुणपत्रिकेवर टक्क्यांऐवजी आता श्रेणी दिसणार आहेत.
 
काही विषय हे अनिवार्य तर काही ऐच्छिक असणार आहेत. त्यामुळे देशभरातल्या ४०० विद्यापीठातल्या लाखो विद्यार्थ्यांना त्यांचा फायदा होईल असं यूजीसीनं म्हटलं आहे. देशातल्या किंवा इतर राज्यातल्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक पर्याय उपलब्ध असतील असं यूजीसीनं स्पष्ट केलं आहे.
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.