सनी लिऑन फोनमध्ये असण्याला घरचे नाही घेणार आक्षेप

 तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे. सनी लिऑन आणि घरच्यांचा आक्षेप नाही.... हो आता हे शक्य होणार आहे. भारताच्या एका मोठ्या गेमिंग स्टुडिओने बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑन हिच्याशी हात मिळवणी केली आहे. 

Updated: Dec 4, 2015, 07:32 PM IST
सनी लिऑन फोनमध्ये असण्याला घरचे नाही घेणार आक्षेप  title=

मुंबई :  तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे. सनी लिऑन आणि घरच्यांचा आक्षेप नाही.... हो आता हे शक्य होणार आहे. भारताच्या एका मोठ्या गेमिंग स्टुडिओने बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑन हिच्याशी हात मिळवणी केली आहे. 

या डिसेंबर महिन्यापासून गुगल प्ले स्टोअरवर 'सनी लिऑन तीन पत्ती' हा नवीन गेम लॉन्च करण्यात आला आहे. अशा प्रकारे बॉलिवूड सेलिब्रिटीच्या नावाने मोबाईल गेम होण्याची पहिलीच वेळ आहे. 

सनी लिऑन तीनपत्ती या गेममध्ये भारतातील दोन महत्वपूर्ण पासटाइम आहेत. एक तीनपत्ती आणि दुसरा बॉलिवूड... या दोघांसमोर गुगलमध्ये सर्वाधिक सर्च करण्यात येणारी सनी लिऑनही आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.