जाणून घ्या व्हॉट्सअॅपमधील हे ६ फीचर्स

हल्लीची तरुणाई सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून नेटकरी मोठ्या प्रमाणात व्यस्त असतात. त्यामुळे हे अॅप नेहमी नवनवीन फीचर्स आणत असतात. तुम्ही व्हॉट्सअॅप यूजर्स आहात तर तुम्हाला या फीचर्सबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. व्हाट्सअॅपमध्ये आलेत सहा नवे फीचर्स

Updated: Dec 4, 2015, 02:22 PM IST
जाणून घ्या व्हॉट्सअॅपमधील हे ६ फीचर्स title=

नवी दिल्ली : हल्लीची तरुणाई सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून नेटकरी मोठ्या प्रमाणात व्यस्त असतात. त्यामुळे हे अॅप नेहमी नवनवीन फीचर्स आणत असतात. तुम्ही व्हॉट्सअॅप यूजर्स आहात तर तुम्हाला या फीचर्सबद्दल माहिती असणे गरजेचे आहे. व्हाट्सअॅपमध्ये आलेत सहा नवे फीचर्स

स्टार मेसेज - व्हॉट्सअॅपने यूजर्ससाठी स्टार मेसेजचा फीचर अपडेट केलाय. या फीचरद्वारे तुम्ही जीमेलप्रमाणे तुमचे मेसेज आणि मीडिया फाईल्सना स्टार आयकॉनद्वारे सेव्ह करु शकता. 

गुगल ड्राइव्हवर व्हॉट्सअॅप चॅट आणि मीडिया फाईलचा बॅकअप - व्हॉट्सअॅपचे तुमचे महत्त्वाचे मेसेज आणि मीडिया फाईल्सचा बॅकअप घेण्यासाठी या फीचर्सचा वापर होतो. 

नको असलेले चॅट डिलीट करा - तुम्हाला तुमचे मेसेज कुणाला दाखवायचे नाही आहेत का? तसे असेल तर तुम्ही तुमचे चॅट क्लिअर करु शकता. यामध्ये तुम्ही ३० दिवसांपूर्वीचे, सहा महिन्यांपूर्वीचे चॅट क्लिअर करणार आहात याबाबतही ऑप्शन दिलेला आहे. 

अनरीड मार्क कऱण्याची सुविधा - या फीचरद्वारे तुम्ही एखादा मेसेज वाचून पुन्हा अनरीड करु शकता. 

कस्टम नोटिफिकेशनचा वापर करा - काही लोक आणि ग्रुप इतरांच्या तुलनेत महत्त्वाचे असतात. अशा कॉन्टॅक्ट्सना तुम्ही वेगळ्या प्रकारे नोटिफिकेशन अलर्ट ठेवू शकता. यासाठी व्हॉट्सअॅपमध्ये हे फीचर देण्यात आलेय. यात नोटिफिकेशन टोन, वायब्रेशन टोन, पॉपअप नोटिफिकेशन आणि नव्या मेसेजसाठी एलईडी कलर सेट करु शकता. 

लिंक प्रिव्ह्यू - जेव्हा एखादी लिंक व्हॉट्सअॅप चॅटवर येते तेव्हा त्याच्या हेडलाईन अथवा यूआरएलच्या सहाय्याने तुम्ही लिंक प्रिव्ह्यू पाहू शकता. फेसबुक आणि ट्विटरवर हे फीचर देण्यात आले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.