मुंबई : रिलायंस जिओने काही दिवसांपूर्वी इंटरनेटचे प्लान कमी करुन टेलीकॉम मार्केटमध्ये मोठं वादळ आणलं होतं. यामुळे इतर कंपन्यांपुढे मोठं आव्हान तयार झालं होतं. मार्केटमध्ये आपलं स्थान कायम ठेवण्यासाठी आणि जिओसोबत स्पर्धा करण्यासाठी वोडाफोन आणि बीएसएनएलने हातमिळवणी केली आहे. दोन्ही कंपन्यांमध्ये करार झाला आहे.
वोडाफोन आणि बीएसएनएलने अखिल भारतीय स्तरावर 2जी सर्कलच्या रोमिंगबाबत करार केला आहे. यामुळे दोन्ही कंपन्यांच्या ग्राहकांना चांगली सेवा मिळणार आहे. यामुळे कॉल ड्रॉपची समस्या देखील कमी होऊ शकते. 2जी नेटवर्कच्या विस्तार होण्यासाठी फायदा होईल. ग्रामिण भागात याचा अधिक फायदा होणार आहे. तर बीएसएनएलला शहरी भागात मदत होणार आहे.
देशभरात वोडाफोन इंडियाचे 1,37,000 मोबाईल टॉवर आहेत. देशभरात बोडाफोनचे 19.9 कोटी ग्राहक आहेत. रिलायंस जियो आणि बीएसएनएलने 2जी आणि 4जी सेवेच्या सर्कलमध्ये रोमिंगवर करार केला आहे. देशभरात बीएसएनएलचे 1,14,000 नेटवर्क साईट आहेत. ग्रामीण भागात बीएसएनएलचे जाळे अधिक आहे.