close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मृत व्यक्तीच्या फेसबूक अकाऊंटचं काय होतं?

मृत्यूआधी अनेक जण आपलं मृत्यूपत्र तयार करतात. या मृत्यूपत्रामध्ये व्यक्तीची संपत्ती कोणाला देण्यात येईल याबाबत लिहीलं असतं.

Updated: Sep 12, 2016, 05:52 PM IST
मृत व्यक्तीच्या फेसबूक अकाऊंटचं काय होतं?

मुंबई : मृत्यूआधी अनेक जण आपलं मृत्यूपत्र तयार करतात. या मृत्यूपत्रामध्ये व्यक्तीची संपत्ती कोणाला देण्यात येईल याबाबत लिहीलं असतं. पण मृत व्यक्तीच्या फेसबूकचं नेमकं काय होतं, हे बहुतेक जणांना माहिती नाही. 

मृत्यूपत्राप्रमाणेच तुम्ही फेसबूकवरही तुमचा वारसदार निवडू शकता. या वारसदारामध्ये तुम्ही तुमचा जवळचा मित्र किंवा नात्यातल्या व्यक्तीला वारसदार नेमु शकता. हा वारसदार नेमण्यासाठी फेसबूकच्या सेटिंग्समध्ये सिक्युरिटी सेटिंग्स हा ऑप्शन आहे. या ऑप्शनमध्ये लिगसी सेटिंगवर जाऊन तुम्ही तुमच्या वारसदाराची नेमणूक करु शकता. 

मृत व्यक्तीनं वारसदाराची निवड केली नसेल तर त्या मृत व्यक्तीचा नातेवाईक किंवा मृत्यूआधी त्या व्यक्तीनं नेमलेला वारसदार फेसबूकला या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं सांगू शकतो. https://www.facebook.com/help/contact/228813257197480

या लिंकवर जाऊन तुम्ही फेसबूकनं दिलेला फॉर्म भरू शकता. या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचं नाव, मृत व्यक्तीचं नाव, मृत व्यक्तीच्या फेसबूक टाईमलाईनवरचा युआरएल, मृत व्यक्तीचा ईमेल आयडी आणि मृत व्यक्तीचं डेथ सर्टिफिकेट फेसबूकला देणं बंधनकारक आहे. या फॉर्ममध्ये तुम्हाला मृत व्यक्तीचं अकाऊंट डिलीट करण्याचा आणि मेमोरियलाईज करण्याचा ऑप्शन आहे. 

अकाऊंट मेमोरियलाईज करणं म्हणजे काय?

अकाऊंट मेमोरियलाईज केल्यानंतर मृत व्यक्तीबाबत त्याच्या टाईमलाईनवर फक्त नातेवाईक आणि मृत व्यक्तीचे नातेवाईकच लिहू शकतात. अकाऊंट मेमोरियलाईज झाल्यानंतर फेसबूकच्या मृत व्यक्तीच्या अकाऊंटचं पेजमध्ये रुपांतर होतं.  

वैयक्तिक सुरक्षेच्या कारणास्तव फेसबूक मृत व्यक्तीची कोणतीही लॉगिन इन्फॉर्मेशन शेअर करत नाही. अकाऊंट मेमोरियलाईज झाल्यानंतर कोणतीही व्यक्ती मृत व्यक्तीच्या अकाऊंटमधून पर्सनल इन्फॉरमेशन म्हणजेच फेसबूकवर केलेल्या चॅटिंगचे मेसेज पाहू शकत नाही किंवा त्यामध्ये बदलही करू शकत नाही. 

अकाऊंट मेमोरियलाईज झाल्यानंतर मृत व्यक्तीचे नातेवाईक आणि मित्र फोटो आणि पोस्ट्सच्या माध्यमातून मृत व्यक्तीला श्रद्धांजली देऊ शकतात. ही पोस्ट्स आणि फोटो मृत व्यक्तीचे मित्र आणि नातेवाईकांनाच पाहता येऊ शकतात.