जपानी कंपनी पॅनासोनिकने आपला इलुगा सीरीज स्मार्टफोन बाजारात उतरवला आहे. हा इलुगा ए आणि डयुअल सिम फोन असून 1.2 जीएचझेड कॅाडकोर स्नॅपड्रॅगन 200 प्रोसेसर वर चालतो.
हा विशेष डिजाइन केलेला असून डबल टैप टेक्नोलॉजी पासून बनवलेला आहे. म्हणजे स्क्रीन वर दोन वेळा टॅप केल्यावर हा चालू होतो. शिवाय यात फिट होम युआय आहे ज्यामुळे तूम्ही एका हातानेही तो हाताळू शकता.
याची विशेषता म्हणजे यात आवाज वाढवण्यासाठी आणि आवाज स्पष्ट येण्यासाठी विशेष टेक्नॉलॉजी वापरली आहे. यात हिंदी, मराठी, तमिळ, तेलगु आणि बंगाली भाषेचा पर्याय आहे.
खास फीचर्सः
*स्क्रीन- 5 इंच (854x480 पिक्सल) आईपीएस डिस्पले
*प्रॉसेसर- 1.2 जीएचजेड क्वॉड कोर स्नॅपड्रॅगन 200 प्रॉसेसर
*सिम- डुअल सिम
*रियर कॅमरा- 8 मेगापिक्सल, एलईडी फ्लैश सोबत
*फ्रंट कॅमरा- 1.3 मेगापिक्सल
*रॅम- 1 जीबी, 4 जीबी इंटरनल स्टोरेज
*जाडी- 92 मिमी
*अन्य फीचर- 3जी, वाई-फाई, ब्लूटुथ
*बॅटरी- 2000 एमएएच
*किंमत- 9,490 रुपये (एमआरपी)
*रंग- सफेद, काळा
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.