बजाजच्या दोन 'ढासू' बाईक्स बाजारात...

बजाज ऑटोनं मंगळवारी आपली मोटर सायकलचा विस्तार करताना आपले दोन मॉडल AS150 आणि AS200 बाजारासमोर सादर केलेत.

Updated: Apr 14, 2015, 05:08 PM IST
बजाजच्या दोन 'ढासू' बाईक्स बाजारात...  title=

दिल्ली : बजाज ऑटोनं मंगळवारी आपली मोटर सायकलचा विस्तार करताना आपले दोन मॉडल AS150 आणि AS200 बाजारासमोर सादर केलेत.

दिल्लीमध्ये या मोटारसायकलची एक्स शोरूम किंमत क्रमश: 79,000 रुपये आणि 91,550 रुपये आहे. 

कंपनीच्या पल्सर अॅडव्हेन्चर सीरीजमध्ये AS150 आणि AS200 या दोन बाईक लॉन्च केल्यात.

कंपनीचे मोटारसायकल बिझनेसचे अध्यक्ष एरिक वास यांच्या म्हणण्यानुसार, युवकांमध्ये पल्सर अॅडव्हेन्चर स्पोर्टस सीरिजची आवड लक्षात घेऊन या दोन बाईक बनवण्यात आल्यात. शहरांमध्ये दररोजच्या वापरासाठी या बाईक अत्यंत उपयोगी ठरू शकतील. 

ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार आणि सल्ल्यानुसार बजाज नवं नवे मॉडेल्स बाजारात सादर करीत राहील, अशी हमीही वास यांनी यावेळी दिली. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.