इंटरनेट यूझर्ससाठी रिलायन्स जिओचा धमाकेदार 'फोर जी' प्लान!

रिलायन्स जिओनं इंटरनेट डाटासाठी एक जबरदस्त प्लान सादर केलाय. आपल्या एका नव्या प्लानसहीत उपभोक्त्यांसाठी 200 रुपयांच्या सिमकार्डवर 75 जीबीचा डेटा देणार आहे. 

Updated: Mar 30, 2016, 06:24 PM IST
इंटरनेट यूझर्ससाठी रिलायन्स जिओचा धमाकेदार 'फोर जी' प्लान! title=

नवी दिल्ली : रिलायन्स जिओनं इंटरनेट डाटासाठी एक जबरदस्त प्लान सादर केलाय. आपल्या एका नव्या प्लानसहीत उपभोक्त्यांसाठी 200 रुपयांच्या सिमकार्डवर 75 जीबीचा डेटा देणार आहे. 

म्हणजेच, या ऑफरवर इंटरनेट युझर्स केवळ 200 रुपयांत 4500 मिनिटांपर्यंत इंटरनेटवर डाटा वापरू शकतील. 

रिलायन्स जिओची फोर जी सर्व्हिस लवकरच देशभरात सुरू होणार आहे. कंपनीच्या लॉन्चिंग ऑफरमध्ये 200 रुपयांत तीन महिन्यांचा टॉकटाईम आणि 75 जीबी फोर जी डाटासहीत फोर जी सिम उपलब्ध केलं जाईल. याची व्हॅलिडिटी केवळ 3 महिन्यांपर्यंत असेल. 

सिमकार्डची विक्री कधीपासून सुरू होईल, याचा खुलासा मात्र अद्याप कंपनीनं केलेला नाही.