नवी मुंबई : स्नॅपडीलला नवी मुंबईतील दोन जणांनी फसवल्याचं समोर आलं आहे. स्नॅपडीलमधून आलेला फोन नकली असल्याचं सांगून चांगला फोन चोरण्याच्या आरोपाखाली या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यात एक महिला आणि तरूणाचा समावेश आहे.
आपलं नातं मुलगा आणि आईटं असल्याचं हे सांगतात, यात महिलेचं नाव ४९ वर्षीय महिलेचं नाव अनिता शिरीष कुलकर्णी आहे, तर २४ वर्षीय मुलाचं नाव मोबिम युसूफवाले आहे.
स्नॅपडीलकडून तक्रार आल्यानंतर यांच्या घरावर क्राईम ब्रॉन्चने धाड टाकली, तेव्हा त्यांच्या घरात ८ लाख रूपये किंमतीचे १७ आयफोन सापडले. पोलिसांनी ई-टेलर्सनाही आवाहन केलं आहे की, जर त्यांनाही यांनी फसवलं असेल, तर तक्रार देण्यास पुढे यावे.
पहिल्यांदा हे कॅश ऑन डिलेवरी फोन बुक करत होते, जेव्हा पार्सल यांच्या भाड्याच्या घरी येत होतं, तेव्हा ते त्याला आत घेऊन जात आणि एक तसाच दिसणारा बनावट फोन ते परत करत होते. असं अनेक वेळा झाल्यानंतर स्नॅपडीलने त्यांची तक्रार क्राईम ब्राँचकडे केली आणि त्यांना अटक करण्यात आली.