ट्विटर-फेसबूक अकाऊंट सुरक्षित ठेवण्याचे आठ उपाय

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसचं अधिकृत ट्विटर हँडल हॅक करण्यात आलं आहे.

Updated: Dec 1, 2016, 11:34 AM IST
ट्विटर-फेसबूक अकाऊंट सुरक्षित ठेवण्याचे आठ उपाय title=

मुंबई : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसचं अधिकृत ट्विटर हँडल हॅक करण्यात आलं आहे. या दोन्ही ट्विटर हँडलवरून आक्षेपार्ह मजकूर टाकण्यात आला आहे. अशाप्रकारे अकाऊंट हॅक झाल्यामुळे सायबर सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अकाऊंट हॅक होणं रोखण्यासाठी हे आठ उपाय तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरू शकतात.

१. सोशल मीडियावर तुमचा पासवर्ड मजबूत असायला हवा

२. हा पासवर्ड कुणाशीही शेअर करू नका

३. सोशल मीडियावर अनावश्यक चर्चांमध्ये स्वत:ला गुंतवून घेऊ नका... एखाद्या व्यक्तीसोबत मतभेद असतील तर समोरासमोर बसून सोडवून टाका.

४. आपले फोटो नेहमी खाजगी ठेवा

५. गुगलवर सर्च करताना योग्य पद्धतीनं सर्च कराव्या

६. सोशल मीडियावर अनोळखी लोकांसोबत मैत्री टाळा. आपल्या मित्र मंडळींची निवड योग्य पद्धतीनं करा.

७. तुमचं युझरनेम योग्य पद्धतीनं निवडा

८. आपल्या मित्रमंडळींबाबत नेहमी जागरुक राहा... त्यांच्याबद्दल माहिती ठेवा.