भारतात यापुढे सॅमसंगचे मिळणार फक्त ४ जी स्मार्टफोन

कोरियाची इलेक्‍ट्रॉनिक्‍स कंपनी सॅमसंग भारतात आता फक्त 4 जी/व्होल्ट स्मार्टफोनचं विक्रीसाठी आणणार आहे.

Updated: Oct 21, 2016, 07:55 AM IST
भारतात यापुढे सॅमसंगचे मिळणार फक्त ४ जी स्मार्टफोन title=

मुंबई : कोरियाची इलेक्‍ट्रॉनिक्‍स कंपनी सॅमसंग भारतात आता फक्त 4 जी/व्होल्ट स्मार्टफोनचं विक्रीसाठी आणणार आहे.

सॅमसंग इंडियाचे उपाध्यक्ष मनू शर्मा यांनी म्हटलं की, 'देशातील स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांपैकी 80 टक्के 4 जी सेवेकडे वळले आहेत. त्यामुळे भविष्यात फक्त ४जी स्मार्टफोन सादर करण्यात येतील. स्मार्टफोनचे उत्पादन वाढविण्यासाठी कंपनी नोएडा येथील प्रकल्पात दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. स्मार्टफोन बाजाराचा 48.6 टक्के भाग सॅमसंगने व्यापला आहे. भारतात सॅमसंगचे 25 ४ जी स्मार्टफोन आहेत.

गॅलेक्‍सी नोट 7 स्मार्टफोनचं उत्पादन आणि विक्री जागतिक पातळीवर कंपनीने बंद केली आहे. भारतात हा स्मार्टफोन लॉन्च केला गेला नव्हता. पण बाहेरुन ज्यांनी हा स्मार्टफोन घेतला त्यांना ते परत करता येणार आहे.