मुंबई : 'ओपो'ने 'ओपो आर ९ एस' आणि 'आर ९ एस प्लस' असे दोन नवे स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. हे फोन चीनमधील ग्राहकांना लवकरच उपलब्ध होणार असून भारतासह अन्य देशांमध्ये हे फोन कधी दाखल होतील याबाबत मात्र कंपनीने कोणतीही माहिती उघड केलेली नाही.
ओपोने नव्या स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देऊन सेल्फीवेड्या तरुणाईला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. कॅमेरा क्वालिटीचा दर्जा राखण्यात या कंपनीचे वैशिष्ट्य आहे.
ओपो आर ९ एस
डिस्प्ले - ५.५ इंच, फूल एचडी (१०८० x १९२० पिक्सल रेजुलेशन, कॉर्निंग गोरीला ग्लास ५ चं प्रोटेक्शन)
प्रोसेसर - २.० गिगाहर्ट्झ स्नॅपड्रॅगन ६२५ ऑक्टोपस प्रोसेसर
रॅम - ४ जीबी, अड्रीनो ५०६ जीपीयू
बॅटरी - ३०१० एमएएच (व्हूक फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करणार)
ओपो आर ९ एस प्लस
डिस्प्ले - ६ इंच, फूल एचडी (१०८० x १९२० पिक्सल रेजुलेशन, कॉर्निंग गोरीला ग्लास ५ चं प्रोटेक्शन)
प्रोसेसर - १.९ गिगाहर्ट्झ स्नॅपड्रॅगन ६५३ ऑक्टा-कोअर प्रोसेसर
रॅम - ६ जीबी, अड्रीनो ५१० जीपीयू
इंटरनल मेमरी - ६४ जीबी
एक्पांडेबल मेमरी - १२८ जीबी
बॅटरी - ४००० एमएएच (व्हूक फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करणार)
- या दोन्ही फोन्सच्या होम बटणवरच फिंगरप्रिंट सेंसर लावण्यात आला आहे. बॅक आणि फ्रण्ट असे दोन्ही कॅमेरे १६ मेगापिक्सलचे आहेत. एलईडी फ्लॅशही देण्यात आला आहे. शिवाय दोन्ही फोनमध्ये हायब्रिड कार्ड स्लॉट आहे.
- कनेक्टिव्हिटीबाबत सांगायचं तर दोन्ही फोन फोर-जी, वायफाय, ब्ल्यू टूथ, जीपीएसला सपोर्ट करणारे आहेत.
- ओपो आर ९ एसची किंमत २,७९९ युआन (अंदाजे २७,७०० रुपये), तर आर ९ एस प्लसची किंमत ३, ४९९ युआन (अंदाजे ३४,६०० रुपये) ठेवण्यात आली आहे.