मुंबई : गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष... नवीन वर्षाचा उत्साह... आज तुम्ही जर कोणाला अद्यापही शुभेच्छा देणारा मेसेज पाठवला नसेल तर काळजी करू नका. आम्ही तुमच्यासाठी काही मेसेज आणले आहेत. यातील एखादा मेसेज तुमच्या मित्रांना किंवा कुटुंबीयांना पाठवा.
नववर्ष म्हणजे चैतन्याचा नवा नवा स्पर्श,
प्रत्येक क्षणी लाभू दे न संपणारा हा हर्ष...
हर्षाने होऊ दे हे जीवन सुखी,
आणि गजबजुन उठू दे आयुष्याची पालखी...
गुडीपाडव्याच्या कोटी कोटी शुभेच्छा..
***
चैत्रपालवी,हिरवं मन,कोकिळेचा मंजुळस्वर,
स्वप्नपूर्तीसाठी आश्वासक वाटचाल,
पुन्हा एक नवी सुरूवात,
आपल्याला नवीन वर्षातील
सुखीसमृद्ध, यशोदायी, वाटचालीसाठी
मन:पुर्वक शुभेच्छा
***
चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा
साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा,
मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण
स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
***
छत्रपती शिवाजी महाराज व आई तुळजा भवानीच्या कृपेने हे वर्ष तुम्हाला व तुमच्या परिवाराला सुखाचे, समृद्धीचे व भरभराटीचे जावो.... हिंदू नववर्षांच्या हार्दिक शुभेच्छा
***
सर्व बौध्दिकप्रेमींना गुढी पाडव्याच्या, नववर्षाच्या शुभेच्छा !
येता काळ निसर्गाच्या कृपाछायेने समृद्ध, सुखमय सलोख्याचा व शांतीमय असो ही प्रार्थना !
***
चैत्राची सोनेरी पहाट
नव्या स्वप्नांची नवी वाट
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव-वर्षाची हीच तर खरी सुरुवात!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
***
वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती,
नव्या वर्षी नव्या भेटी,
नव्या क्षणाशी नवी नाती,
नवी पहाट तुमच्यासाठी,
शुभेच्छांची गाणी गाती...!!!
***
एक नवी पहाट,
एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला,
एक नवी दिशा !
नवे स्वप्न,
नवी क्षितिजे,
सोबत एक माझी
नवी शुभेच्छा !
शुभ पाडवा !
***
माझ्या कडुन आपणास आणि आपल्या कुटुंबातील सर्वांना येणाऱ्या नवीन मराठी वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ......!
***
चित्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात…
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!