सॅडिस्कनं केला 512 जीबीचे मॅमरी कार्ड लॉन्च

मेमरी कार्डसाठी ओळखल्या जाणाऱ्या सॅडिस्क या कंपनीनं ‘पोर्टेबलिटी’च्या जगामध्ये 512जीबीचे मॅमरी कार्ड लॉन्च करून संपूर्ण जगाला धक्का दिला आहे. गॅजेटच्या जगात जास्त मेमरी असलेले कार्ड हे महागडे असते. त्यामुळे गॅजेट प्रेमींना ते खरेदी करताना मोठा त्रास होत होतो.

Updated: Sep 15, 2014, 05:21 PM IST
सॅडिस्कनं केला 512 जीबीचे मॅमरी कार्ड लॉन्च title=

नवी दिल्ली : मेमरी कार्डसाठी ओळखल्या जाणाऱ्या सॅडिस्क या कंपनीनं ‘पोर्टेबलिटी’च्या जगामध्ये 512जीबीचे मॅमरी कार्ड लॉन्च करून संपूर्ण जगाला धक्का दिला आहे. गॅजेटच्या जगात जास्त मेमरी असलेले कार्ड हे महागडे असते. त्यामुळे गॅजेट प्रेमींना ते खरेदी करताना मोठा त्रास होत होतो.

512जीबीचा मेमरी कार्ड असेल या गोष्टीवर कोणाचा विश्वास देखील बसणार नाही. पण, आता 512 जीबीचे मेमरी कार्ड लवकरच बाजारात उपलब्ध होईल, असे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. सॅडिस्क प्रो एसडीएक्ससी यूएचएस-1 मधून फोटोग्राफर्स आणि व्हिडिओग्राफर्स 4K चार हजार रिझॉल्युशनवर काम करणाऱ्यासाठी अजून सोपं होईल. पूर्वी कमी मेमरी असल्यामुळे प्रोफेशनल्स व्यक्तींना काम करताना खूप त्रास होत होता. त्यासाठी 512जीबीचे मेमरी कार्ड लॉन्च केल्याचे सॅडिस्क कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

जास्त क्षमता असलेले मेमरी कार्ड हे आताच लॉन्च आहे, असे नाही तर या आधी देखील जास्त क्षमता असलेले कार्ड लेक्सर या कंपनीने 2012मध्ये लॉन्च केले होत. 256 जीबीचे ते मेमरी कार्ड होते. सॅडिस्कने 128जीबीचे कार्ड याआधी लॉन्च केले होते.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.