गुगलचा स्वस्त 'अँड्रॉईड वन' भारतात दाखल

गुगलने भारतीय मोबाईल फोन निर्माता कंपनींसोबत तीन स्वस्त अँड्रॉईड स्मार्टफोन लॉन्च केले आहेत, हे तीनही फोन गुगलच्या 'अॅड्रॉएड वन' चा भाग आहेत. 

Updated: Sep 15, 2014, 05:20 PM IST
गुगलचा स्वस्त 'अँड्रॉईड वन' भारतात दाखल title=

मुंबई  : गुगलने भारतीय मोबाईल फोन निर्माता कंपनींसोबत तीन स्वस्त अँड्रॉईड स्मार्टफोन लॉन्च केले आहेत, हे तीनही फोन गुगलच्या 'अँड्रॉईड वन' चा भाग आहेत. 

इंटरनेट कंपनी गूगलने भारतीय मोबाईल फोन निर्माता कंपनी मायक्रोमॅक्स, कार्बन आणि स्पाइससोबत मिळून नवीन प्रोजेक्ट सुरू केले आहेत.

हायस्पीड प्रोसेसिंग, डुअल सिम कार्ड, एफएम रेडिओ, एसडी कार्ड मेमरी आणि पाच मेगापिक्सल कॅमेऱ्यासह अॅडव्हान्स फीचर असलेल्या या फोन्सची किंमत ६ हजार ३९९ पासून सुरू होणार आहे.

हे फोन आजपासून काही निवडक ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर मिळण्याची शक्यता आहे.

गुगल अँड्रॉईडचे प्रमुख सुंदर पिचाई यांनी म्हटलंय, भारतीय स्मार्टफोन बाजारात मोठी आव्हानं आहेत, हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि कनेक्टिविट. या आव्हानांवर मात करण्यासठी गुगल अँड्रॉईड वन डिव्हाईस सॉफ्टवेअर अपग्रेड करण्याची आणि सुरक्षेची गारंटी घेणार आहे.

भारतातला पहिल्यांदा 'अँड्रॉईड वन'
भारतात वेगाने स्मार्टफोनचा बाजार वाढतोय, म्हणून गुगलने अँड्रॉईड वन प्रोजेक्टची सुरूवात भारतापासून केली आहे.सुंदर पिचाई यांनी दिलेल्या माहितीनुसार अँड्रॉईड वन बांगलादेश, इंडोनेशिया आणि फिलीपाईन्समध्ये उपलब्ध असेल.

सर्व अँड्रॉईड वन फोनचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरचे स्पेसिफिकेशन्स हे गुगलने ठरवलेले आहेत, फक्त त्यांना भारतीय मोबाईल कंपन्यांनी बनवलं आहे. अँड्रॉईड वन फोनचा सामना याच समान किंमती असलेल्या, फीचर्स असलेल्या मोटो ई आणि चीनी कंपनीच्या शाओमी रेडमी एस वन सोबत होणार आहे. अँड्रॉईड वन स्मार्टफोन्सला गुगल ब्रॅण्डिंगचा सरळ फायदा होण्याची शक्यता आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.