नवी दिल्ली : टियागो हॅचबॅकवर बनलेली टाटाची नवी कॉम्पॅक्ट सेडान टीगॉर लाँच झाली आहे. याची किंमत 4.70 लाख रूपयापासून सुरु होते जी 7.09 लाख रूपयांपर्यंत जाते. या गाडीचं कमपेरिजन होंडा अमेज, हुंडई एक्सेंट, फॉक्सवेगन एमियो, मारूती सुझुकी स्विफ्ट डिजायर, फोर्ड फीगो एस्पायर आणि कॉम्पॅक्ट सेडान जेस्ट सोबत करता येणार आहे.
टाटा टीगॉरचे वेरिएंट आणि किंमत
किंमत (पेट्रोल) (डिझेल)
एक्सई 4.70 लाख 5.60 लाख
एक्सटी 5.41 लाख 6.31 लाख
एक्सजेड 5.90 लाख 6.80 लाख
एक्सजेड (ओ) 6.19 लाख 7.09 लाख
टीगॉरमध्ये पुढे ड्यूल-टोन बम्पर, नवी हनीकॉम्ब ग्रिल आणि ड्यूल-बॅरल हँडलेप्ससोबत स्मोक्ड प्रोजेक्टर हेडलाईट दिली गेली आहे. मागील बाजुला एलईडी टेललाइटे आणि रेअर विंडशील्डवर एलईडी स्टॉप-लँप स्ट्रीप दिली गेली आहे. टीगॉरच्या पेट्रोल एक्सजेड वेरिएंटमध्ये १५ इंचचा अलॉय व्हील दिला गेला आहे. डिझेल व्हर्जनमध्ये टियागो प्रमाणे १४ इंचचा अलॉय व्हील दिला गेला आहे.
टीगॉरच्या केबिनमध्ये काही सेगमेंट फर्स्ट फीचर दिले गेले आहेत. टीगॉरमध्ये हारमनचे 8-स्पीकर्स (4 स्पीकर्स आणि 4 ट्विटर्स) वाले साउंड सिस्टम, 5.0 इंचीचा इंफोटेंमेंट सिस्टम दिला गेला आहे. रिवर्स कॅमरा, वीडियो प्लेबॅक, वॉइस कमांड रिकग्निशन, जीपीएस नेविगेशन आणि एसएमएस रीड-आउटची सुविधा देखील देण्यात आली आहे. याशिवाय १२ वोल्टचे २ पावर सॉकेट आणि रियर आर्मरेस्टसोबत कपहोल्डर्सची सुविधा दिली गेली आहे. टीगॉरचा बूट स्पेस 419 लीटर आहे.
टीगॉरमध्ये टियागो हॅचबॅकचं पेट्रोल आणि डिझेल इंजन दिलं गेलं आहे,. पेट्रोल वर्जनमध्ये 1.2 लीटरचे 3-सिलेंडर इंजिनं दिलं गेलं आहे. जो 85 पीएसची पावर आणि 114 एनएमचं टॉर्क देतो. पेट्रोल वर्जनचं मायलेज हे 20.3 किमी प्रती लीटर तर डिझेल वर्जनमध्ये 1.05 लीटरचे 3-सिलेंडर इंजिन दिलं गेलं आहे जो 70 पीएसची पावर आणि 140 एनएमचं टॉर्क देतो. डिझेल वर्जनचं मायलेज 24.7 किमी प्रती लीटर असल्याचा कंपनीचा दावा आहे. टीगॉरमध्ये दोन इंजिनसोबत ५-स्पीड मॅनुअल गिअरबॉक्स दिला गेला आहे.