ऑफर संपल्यानंतर जिओकडे लोकांची पाठ

रिलायन्स जिओची हॅप्पी न्यू ईअरची मोफत डेटा आणि फ्री कॉलिंगची ऑफर ३१ मार्चला संपणार आहे. त्यानंतर तुम्हाला जिओची प्राईम मेंबरशीप ऑफर पुन्हा सबस्क्राईब करावी लागेल. पण जिओच्या फक्त १३ टक्के ग्राहकांनीच जिओची ही प्राईम मेंबरशीप घेतली आहे. त्यामुळे मोफत कॉल आणि डेटाच्या ऑफरनंतर ग्राहक जिओकडे पाठ फिरवल्याचं दिसतंय.

Updated: Mar 29, 2017, 02:28 PM IST
ऑफर संपल्यानंतर जिओकडे लोकांची पाठ title=

मुंबई : रिलायन्स जिओची हॅप्पी न्यू ईअरची मोफत डेटा आणि फ्री कॉलिंगची ऑफर ३१ मार्चला संपणार आहे. त्यानंतर तुम्हाला जिओची प्राईम मेंबरशीप ऑफर पुन्हा सबस्क्राईब करावी लागेल. पण जिओच्या फक्त १३ टक्के ग्राहकांनीच जिओची ही प्राईम मेंबरशीप घेतली आहे. त्यामुळे मोफत कॉल आणि डेटाच्या ऑफरनंतर ग्राहक जिओकडे पाठ फिरवल्याचं दिसतंय.

१ एप्रिलपासून जिओची नवीन ऑफर येत आहे. या ऑफरसाठी तुम्हाला पैसे भरावे लागणार आहेत. ९९ रुपयांचा रिचार्ज तुम्हाला करावा लागणार आहे.
गेल्या चार आठवड्यात रिलायन्स जिओची २ कोटी नव्या ग्राहकांची नोंद झालेली आहे. रिलायन्स जिओने १७० दिवसांमध्ये १० कोटी ग्राहकांचा आकडा गाठला. प्राईम मेंबरशीपसाठी केवळ १ कोटी ६० लाख ग्राहकांनीच नोंदणी केली आहे.

मोफत डेटा आणि कॉलिंग ऑफरच्या समाप्तीनंतर जिओचे ग्राहक आता इतर कंपन्यांकडे वळू शकतात. एअरटेल, आयडिया, व्होडाफोन, एअरसेल, यूनिनॉर, टेलिनॉर यायारख्या कंपन्या दूरसंचार कंपन्यांमधील "टेरीफ वॉर' संपण्याची चिन्हे आहेत. यामुळे इतर कंपन्यांना पुन्हा फायदा होणार आहे.