मुंबई: व्हॉट्सअॅपनं अँड्रॉइड युजर्ससाठी तीन नवे फीचर्स बाजारात आणले आहेत. जे लोक अँड्रॉइड फोन वापरत असतील त्यांनी आपले व्हॉट्सअॅप (व्ही.२.१२.१९४) व्हर्जन डाऊनलोड करा आणि तीन नवीन फीचर्सचा लाभ घ्या.
एक नजर टाकूयात या तीन फीचर्सवर...
मार्क अॅज अनरिड ऑप्शन : जर तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्टला थोड्या वेळानंतर रिप्लाय करायचा असेल तर तुम्ही वाचलेली संभाषणं मार्क अॅज अनरिड करू शकतात.
कस्टम नोटिफिकेशन तुमच्या मीडिया विभागाच्या खाली चॅट सेटिंग्स तसंच म्यूट चॅट खाली कस्टम नोटिफिकेशन हे ऑप्शन मिळेल. या फिचर्समध्ये तुम्ही प्रत्येक कॉन्टॅकला वेगवेगळी रिंगटोन्स निवड करू शकता. यामुळं कुठले मेसेजेस महत्वाचे आहेत आणि कुठले नाहीत हे त्या रिंगटोन्सवरून कळू शकेल.
लो डेटा युसेज ऑप्शन : जर तुमच्याकडे इंटरनेटचा डेटा कमी असेल तर हे ऑप्शन तुमचा डेटा सेव्ह करायला मदत करेल. व्हॉईस कॉल्सना लागणारा डेटा यात कमी वापरला जाईल. तसंच तुम्ही तुमचा व्हॉट्सअॅपवर किती डेटा युज झाला आहे, त्याचा रेकॉर्डही ठेवू शकाल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.