५,००० रुपये कमी किंमतीत मिळणार 'वनप्लस वन' स्मार्टफोन

'वनप्लस वन' स्मार्टफोनचं ६४ जीबी व्हर्जन केवळ १६,९९९रुपयांत मिळणार आहे. बुधवारी २० मे रोजी दुपारी दोन वाजता 'ओव्हरकार्ट' वेबसाईटवर याची विक्री होणार आहे. या फोनची किंमत याची ऑफिशिअल पार्टनर 'अॅमेझॉन'वर २१,९९८रुपये आहे. 

Updated: May 18, 2015, 06:37 PM IST
५,००० रुपये कमी किंमतीत मिळणार 'वनप्लस वन' स्मार्टफोन title=

मुंबई: 'वनप्लस वन' स्मार्टफोनचं ६४ जीबी व्हर्जन केवळ १६,९९९रुपयांत मिळणार आहे. बुधवारी २० मे रोजी दुपारी दोन वाजता 'ओव्हरकार्ट' वेबसाईटवर याची विक्री होणार आहे. या फोनची किंमत याची ऑफिशिअल पार्टनर 'अॅमेझॉन'वर २१,९९८रुपये आहे. 

'ओव्हरकार्ट'वर १६,९९९ रुपयात मिळणाऱ्या वनप्लस वन फोनला सहा महिन्यांची वॉरंटी दिली जाणार आहे. याआधी 'ओव्हरकार्ट'ने शिओमीचे रेडमी 2S आणि रेडमी नोट 4Gचे रिफर्बिश्ड युनिट्स विकले आहेत.

'वनप्लस वन' स्मार्टफोन सायनोजेन ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. यामध्ये २.५ GHz क्वॉलकॉम प्रोसेसर, ३ जीबीची रॅम, ५.५ इंच डिस्प्ले, १३ मेगापिक्सल मेन कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, ३१००mAhची बॅटरी आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.