इंटरनेट शिवाय व्हॉट्सअॅपवर करा चॅटिंग

इंटरनेटशिवायही तुम्ही व्हॉट्सअॅप वापरू शकता हे तुम्हाला माहित होते का? एवढेच नव्हे तर रोमिंगमध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय व्हॉट्सअॅप वापरू शकता.

Updated: Jun 4, 2016, 05:49 PM IST
इंटरनेट शिवाय व्हॉट्सअॅपवर करा चॅटिंग title=

मुंबई : इंटरनेटशिवायही तुम्ही व्हॉट्सअॅप वापरू शकता हे तुम्हाला माहित होते का? एवढेच नव्हे तर रोमिंगमध्ये कोणत्याही अडथळ्याशिवाय व्हॉट्सअॅप वापरू शकता.
आत्तापर्यंत इटरनेट असेल तरच व्हॉट्सअॅप सुरू राहील असे वाटायचे. मात्र काही पर्याय असे आहेत ज्यामुळे तुम्ही इंटरनेट नसले तरी व्हॉट्सअॅप वापरू शकता. तुमचं इंटरनेट सुरू असो वा नसो पण आता फक्त भारतातच नाही तर जगात कोठेही तुम्ही व्हॉट्सअॅप वापरू शकता.

इंटरनेटशिवाय जर तुम्हाला व्हॉट्सअॅप वापरायचे असेल तर तुम्ही चॅट सिमचा वापरू शकता.

काय आहे चॅट सिम ?

चॅट सिम हे जगातील पहिलं सिम कार्ड आहे ज्यामुळे इंटरनेटशिवाय तुम्ही कोणतेही चॅट अॅप्लिकेशन वापरू शकता. फेसबुक मेसेंजर, व्हॉट्सअॅप तुम्ही इंटरनेटशिवाय वापरू शकता. मात्र याचा वापर लिमिटेड आहे. याचा वापर सिमचा इतर कोणत्याही फिचर्सना करता नाही होऊ शकता.

कसा कराल या चॅट सिमचा वापर

जेव्हा तुम्ही चॅट सिम फोनमध्ये टाकता तेव्हा ते लोकल नेटवर्क ऑपरेटरला सर्च करते आणि डेटाशी कनेक्ट करते. जसं ते डेटाशी कनेक्ट होईल तस तुम्ही चॅटिंग सुरू करू शकता. तुमची इंटरनेट सेवा एक्टिवेट करा वा नका करू त्याचा या चॅट सिमला काही फरक पडत नाही.

कोणाला जास्त फायदेशीर

चॅट सिम हे जे विदेशात जास्त प्रवास करतात किंवा राहतात त्यांच्याकरिता फायदेशीर आहे. जर तुम्हाला सतत चॅट करण्याची सवय असेल तर या सिमने तुमचा डेटा पॅकही वाचेल.

जगात एकूण १५० देशांमध्ये चॅट सिमची सेवा उपलब्ध आहे ज्यात भारतही आहे. हे सिम जर तुम्हाला हवे असेल तर तुम्हाला दरवर्षी ९०० रूपये द्यावे लागतील. हे सिम फक्त ऑनलाईनच उपलब्ध आहे.

या चॅट सिमने तुम्ही कोणतेही फोटो किंवा व्हीडीओ शेअर करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला वेगळे पॅकेज घ्यावे लागेल.