...आणि त्याने चक्क 2000ची नोटच जाळली

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर 2000च्या नव्या नोटा चलनात आणल्या.

Updated: Nov 20, 2016, 10:35 AM IST
...आणि त्याने चक्क 2000ची नोटच जाळली title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी जाहीर केल्यानंतर 2000च्या नव्या नोटा चलनात आणल्या.

या नव्या नोटा मिळाल्यावर अनेकांनी या नोटांसोबत सेल्फी काढले आणि सोशल मीडियावर पोस्ट केले. 2000च्या नव्या नोटेबाबत प्रत्येकाला उत्सुकताच होती की कशी आहे ही नोट. अनेकांनी या नोटांवर विविध प्रयोगही केले.

काहींनी ती पाण्यात भिजवून पाहिली तर एका व्यक्तीचे चक्क नोट जाळून पाहिलं. नोट जाळणे अथवा त्या नष्ट करणे हा अपराध मानला जातो. मात्र हा पठ्ठ्या इतक्यावरच थांबला नाही तर त्याचा व्हिडीओही यूट्यूबवर टाकलाय.