वोडाफोनची जुन्या किंमतीत डबल डेटा ऑफर

जिओला टक्कर देण्यासाठी टेलिकॉम कंपनी वोडाफोनने नवी ऑफर आणलीये. या ऑफरअंतर्गत प्रीपेड युजर्सना त्याच किंमतीत डबल डेटा मिळणार आहे. 

Updated: Dec 8, 2016, 10:46 AM IST
वोडाफोनची जुन्या किंमतीत डबल डेटा ऑफर title=

मुंबई : जिओला टक्कर देण्यासाठी टेलिकॉम कंपनी वोडाफोनने नवी ऑफर आणलीये. या ऑफरअंतर्गत प्रीपेड युजर्सना त्याच किंमतीत डबल डेटा मिळणार आहे. 

255 रुपयांच्या डेटापॅकपासून ही ऑफर उपलब्ध आहे. याआधी 255च्या डेटापॅकवर युजर्सना 1 जीबी 4जी डेटा मिळत होता. मात्र आता दोन जीबी डेटा मिळणार आहे. 

त्याचप्रमाणे 459च्या डेटापॅकमध्ये 6 जीबी 4जी डेटा मिळणार आहे. तर 999च्या डेटापॅकमध्ये 20 जीबी तर 1999च्या प्लानमध्ये 40 जीबी डेटा मिळणार आहे. या सर्व डेटापॅकची व्हॅलिडिटी 28 दिवस असेल.