तुमच्या नावाने कोणीतरी पाठवतं फेसबूकवर मॅसेज

फेसबूकवर तुमच्याच नावाचा फेक आयडी बनवून तुमच्या मित्रांना कोणी मॅसेज तर पाठवत नाही ना...? हे तपासून घ्या. कारण काही एका बीटेकच्या मुलीसोबत असं घडलंय. 

Updated: Dec 26, 2015, 07:08 PM IST
तुमच्या नावाने कोणीतरी पाठवतं फेसबूकवर मॅसेज title=

मुंबई : फेसबूकवर तुमच्याच नावाचा फेक आयडी बनवून तुमच्या मित्रांना कोणी मॅसेज तर पाठवत नाही ना...? हे तपासून घ्या. कारण काही एका बीटेकच्या मुलीसोबत असं घडलंय. 

फेसबूक अंकाऊट बनवून तिच्या नावाने तिच्या मित्रांना अगोदर मॅसेज पाठवले जात होते पण नंतर त्या अंकाऊटवर चक्क त्या मुलीचाच प्रोफाईल पिक्चर लावण्यात आला. त्यानंतर त्या तरुणीने पोलिसात तक्रार केली आहे. 

पोलिसांनीही या विरोधात कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. हे अंकाऊट कोण चालवत आहे. याचा पोलीस तपास करतायंत.