मोबाइलची बॅटरी का संपते लवकर?

जर तुमच्या मोबाइलमध्ये गरजेपेक्षा जास्त अॅप असतील तर जरा सावधान!  कारण  अॅपमध्ये जाहिराती असल्यास फोनची बॅटरी जास्त प्रमाणात वापरली जाते. तसंच फोनचा प्रोसेसिंग स्पीडसुद्धा कमी होतो, असं एका रिसर्चमध्ये समोर आलं आहे.

Updated: Apr 4, 2015, 06:24 PM IST
मोबाइलची बॅटरी का संपते लवकर? title=

मुंबई : जर तुमच्या मोबाइलमध्ये गरजेपेक्षा जास्त अॅप असतील तर जरा सावधान!  कारण  अॅपमध्ये जाहिराती असल्यास फोनची बॅटरी जास्त प्रमाणात वापरली जाते. तसंच फोनचा प्रोसेसिंग स्पीडसुद्धा कमी होतो, असं एका रिसर्चमध्ये समोर आलं आहे.

कॅनडाच्या क्वीन युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी अभ्यास केला. या अभ्यासासाठी केलेल्या टेस्टमध्ये ज्या अॅप्समध्ये जास्त जाहिराती असतात, त्या अॅप्समुळं १६ टक्के बॅटरी जास्त खर्च होते. तसंच मोबाइलची बॅटरी सरासरी १ ते २ तास कमी चालते, असा निष्कर्ष काढला आहे.
 
या रिसर्चसाठी जवळपास २१ टॉप अॅप्सची चाचणी करण्यात आली. त्यात गूगल प्ले ४०० अॅप्सचा समावेश होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.