VIDEO : फोनवर बोलताना नदीत पडून मुलीचा मृत्यू

हल्ली जो तो बघाव तेव्हा त्या मोबाईल फोनमध्ये डोकं खुपसून बसलेला असतो. फोनच्या अतिवापरामुळे अनेकदा दुर्घटना घडल्या असल्याचेही ऐकले आहेत. मात्र फोनच्या नादात एका मुलीचा जीव गेल्याची घटना समोर आलीय. 

Updated: Jan 6, 2016, 01:12 PM IST
VIDEO : फोनवर बोलताना नदीत पडून मुलीचा मृत्यू title=

नवी दिल्ली : हल्ली जो तो बघाव तेव्हा त्या मोबाईल फोनमध्ये डोकं खुपसून बसलेला असतो. फोनच्या अतिवापरामुळे अनेकदा दुर्घटना घडल्या असल्याचेही ऐकले आहेत. मात्र फोनच्या नादात एका मुलीचा जीव गेल्याची घटना समोर आलीय. 

मोबाईलफोनवर बोलत असताना एक तरुणी नदीत बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना वानजाऊ येथे घडलीये. वांग असं या महिलेचं नाव आहे. याबाबतचा व्हिडीओही सीसीटीव्ही न्यूजने जारी केलाय. 

ही मुलगी फोनवर बोलण्यात इतकी व्यस्त होती की तिला आपण कुठे चालतोय याचे भानच राहिले नाही. बाजूला असलेल्या नदीत पडली. त्यानंतर काही वेळात या मुलीचा बुडून मृत्यू झाला.