वर्ष नवे, फेसबुकच्या मालकाचा संकल्प नवा

फेसबुकचा मालक मार्क झुकरबर्गने या वर्षी धावण्याचा संकल्प केला आहे. मार्क झुकरबर्गने गेल्या वर्षी पुस्तके वाचन करण्याचा संकल्प केला होता आणि तो बऱ्यापैकी पुढे नेला होता. झुकरबर्गने मात्र या वर्षी धावण्याचा संकल्प केला आहे. 

Updated: Jan 5, 2016, 09:00 PM IST
वर्ष नवे, फेसबुकच्या मालकाचा संकल्प नवा title=

मुंबई : फेसबुकचा मालक मार्क झुकरबर्गने या वर्षी धावण्याचा संकल्प केला आहे. मार्क झुकरबर्गने गेल्या वर्षी पुस्तके वाचन करण्याचा संकल्प केला होता आणि तो बऱ्यापैकी पुढे नेला होता. झुकरबर्गने मात्र या वर्षी धावण्याचा संकल्प केला आहे. 

मार्क झुकरबर्गने फेसबुकवर ए ईयर ऑफ रनिंग असे एक अधिकृत पेज बनविले आहे. या पेजवर त्याने गेल्या महिन्यात भारतात आल्यावर दिल्लीतील इंडिया गेटच्या परिसरात आपल्या सहकाऱ्यांसोबत धावतानाचा फोटो अपलोड केला आहे. 

दरम्यान, या ए ईयर ऑफ रनिंग या पेजला या आठवड्यात ४२,००० पेक्षा जास्त जणांनी लाईक करुन सहभाग घेतल्याचे समजते. गेल्या वर्षी मार्क झुकरबर्गने अनेक पुस्तकांचे वाचन करण्याचा संकल्प केला होता.  

तसेच, २०१६ मध्ये ३६५ मैल धावण्याचे ठरविले असून फेसबुक युजर्सनीही या पेज लाईक करुन त्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपले अनुभव शेअर करावे असेही मार्क झुकबर्गने नमूद केले आहे.