व्हॉटस अॅप लवकरच तुमच्या पीसी डेस्कटॉपवर ?

मोबाईलवरचं 'व्हॉटस अॅप' हे अॅप तुम्हाला लवकरच तुमच्या पीसीच्या डेस्कटॉप देखिल मिळणार आहे. व्हॉटस अॅप या अॅपसाठी पडद्यामागे काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे. हे ऑप्शन डेस्कटॉपवर मिळणार असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

Updated: Dec 15, 2014, 11:33 PM IST
व्हॉटस अॅप लवकरच तुमच्या पीसी डेस्कटॉपवर ? title=

मुंबई : मोबाईलवरचं 'व्हॉटस अॅप' हे अॅप तुम्हाला लवकरच तुमच्या पीसीच्या डेस्कटॉप देखिल मिळणार आहे. व्हॉटस अॅप या अॅपसाठी पडद्यामागे काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे. हे ऑप्शन डेस्कटॉपवर मिळणार असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

व्हॉटस अॅप वेब हे एका कोडने आपल्याला डेस्कटॉपवर वापरता येणार आहे, यात युझर्स कधी लॉग आऊट, लॉग इन झाला हे पाहता येणार आहे, त्यांचं ऑनलाईन स्टेटस पाहण्याची सुविधा सुद्धा यात असणार आहे.

व्हॉटस अॅपने मात्र अजून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. स्पर्धक अॅप्सना मागे टाकण्यासाठी व्हॉटस अॅप हे 'व्हॉटस अॅप वेब' पाऊल उचलणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.