आता अवघ्या 30 सेकंदामध्ये आपला मोबाईल करा चार्ज!

इस्राईलच्या कंपनीनं दावा केलाय की त्यांनी अशी टेक्नॉलॉजी तयार केलीय, ज्याद्वारे अवघ्या 30 सेकंदामध्ये मोबाईल फोन चार्ज केला जावू शकतो. या टेक्नॉलॉजीनं कार बॅटरी मिनीटांमध्ये चार्ज होऊ शकते. त्यामुळं कंज्युमर इंडस्ट्रीला खूप फायदा होईल. 

Updated: Nov 25, 2014, 04:12 PM IST
आता अवघ्या 30 सेकंदामध्ये आपला मोबाईल करा चार्ज! title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई: इस्राईलच्या कंपनीनं दावा केलाय की त्यांनी अशी टेक्नॉलॉजी तयार केलीय, ज्याद्वारे अवघ्या 30 सेकंदामध्ये मोबाईल फोन चार्ज केला जावू शकतो. या टेक्नॉलॉजीनं कार बॅटरी मिनीटांमध्ये चार्ज होऊ शकते. त्यामुळं कंज्युमर इंडस्ट्रीला खूप फायदा होईल. 

यासाठी नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला. कृत्रिम अणूला एकत्रित केलं जातं. तेल अवीवची कंपनी स्टोरडॉटनं सांगितलं की, त्यांनी अशी बॅटरी बनवलीय जी खूप जास्त चार्ज स्टोअर करू शकते. हा एक मोठ्या स्पॉन्जसारखी आहे जिला खूप जास्त पॉवर लागते आणि तो पॉवर बॅटरी आपल्याजवळ ठेवते. 

सध्या या टेक्नॉलॉजीनं बनलेल्या बॅटरीचा आकार मोठा आहे. ती मोबाईल फोनमध्ये फिट नाही होऊ शकत. मात्र कंपनी यावर पण काम करतेय आणि 2016पर्यंत अशी बॅटरी बनेल जी मोबाईल फोन सारख्या छोट्या उपकरणांमध्ये लागेल आणि अवघ्या 30 सेकंदांमध्ये चार्ज होईल. 

स्टोऱडॉटचे संस्थापक डोरोन मियर्सडॉर्फनं सांगितलं की, हा नवा पदार्थ आहे जो पहिले कधी विकसित केला गेला नाही. (एजेंसी इनपुटसह)

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.