सॅन फ्रान्सिस्को : सोशल नेटवर्किगच्या दुनियेत अग्रणी असलेलं ‘फेसबुक’ म्हणजे मैत्र जिवाचा. भावना, मत आणि अनुभवाच्या चार गोष्टीतून अभिव्यक्त होण्याचं सर्वाधिक पसंतीचं माध्यम म्हणजे फेसबुक होय.
लाईकसोबत डिसलाइक ऑप्शनही असावं की नाही, यावर बरीच चर्चा झाली असली तरी ‘फेसबुक’चा प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनाच ‘डिसलाइक’ऑप्शन पसंत नाही.
उत्तर कॅलिफोर्नियातील फेसबुकच्या मुख्यालयात त्यांनी लोकांशी ऑनलाईन संवाद साधत यावर आपलं मत व्यक्त केलं. डिसलाइक ही संकल्पनाच चुकीची असल्यानं हा ऑप्शन देण्यात आलेला नाही. एखादी पोस्ट चांगली की वाईट यासाठी मतदान घेण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.