'हिटलर'नेच करून दाखवलं होतं...

वि. स. वाळिबें याचं 'हिटलर' हे पुस्तक काही दिवसापूर्वीच वाचलं, आणि त्यानंतर मात्र हिटलर या माणसाविषयी प्रचंड कुतूहल वाटायला लागलं. हिटलरने काय काय केलं हे सांगण्याची काहीच गरज नाहीये... कारण त्यांची करणी सगळ्यांनाच ठाऊक आहे.

Updated: May 25, 2012, 12:14 AM IST

रोहित गोळे

www.24taas.com, मुंबई


वि. स. वाळिबें याचं 'हिटलर' हे पुस्तक काही दिवसापूर्वीच वाचलं, आणि त्यानंतर मात्र हिटलर या माणसाविषयी प्रचंड कुतूहल वाटायला लागलं. हिटलरने काय काय केलं हे सांगण्याची काहीच गरज नाहीये... कारण त्यांची करणी सगळ्यांनाच ठाऊक आहे. त्यांने केलेली हिंसा आजवर कोणीच केली नव्हती आणि करणार देखील नाही, किंबहुना आज तशी कुणाचीही कुवत देखील नाही. म्हणजे त्याने केलेल्या हिंसेचे मी समर्थन करतोय असे अजिबात नाही...

 

त्याच्या हिंसेचे कधीच समर्थन होऊ शकत नाही. पण तरीही या व्यक्तीविषयी आस्था वाटू लागते. कारण त्याचा प्रखर राष्ट्रवाद, अन्यायाविरूध्द दिलेला लढा सारं काही थक्क करणारं आहे. आणि मग त्यामुळेच वाटतं हुकूमशाही असावी तर हिटलर सारखीच. हिटलर खऱ्या अर्थाने जर्मन नागरिकांचा त्यावेळेचा हिरो होता, आदर्श होता... त्याने केलेली विकास काम ं ह्याला तर तोडच नव्हती... तो व्यक्तीच्या मनाचा ठाव घेणारा कलाकार होता.. त्याने आधी माणसांची मनं जिकंली आणि नंतर त्यांच्या मेंदूवर मात केली.

 

आज हिटलरची आठवण येते कारण की, आपल्या देशाला आज त्याच्यासारख्या व्यक्तीची खरचं गरज आहे. हिसेंसाठी नाही तर विकासासाठी. त्याने सामन्यांच्या गरजा सर्वात आधी पूर्ण केल्या, आमचे नेतेच इतके सामान्य आहेत की, त्यांच्या स्वत:च्या गरजादेखील अजून पूर्ण होत नाही. स्वत:च्या कुवतीवर आणि कुशाग्र राजकारणी बुद्धीवर त्याने जगाला वेठीस धरलं होतं, आमचे नेते मात्र आम्हांलाच वेठीस धरतात. शेतकरी आज आत्महत्या करतोय, दुष्काळाने थैमान घातलं आहे. एका वेळेच्या जेवणासाठी मारामार अशी अवस्था असणारा आमचा देश... आणि आम्ही महासत्ता होण्याची स्वप्न पाहत आहोत..

 

हिटलरने आपल्या छोट्याशा कारकिर्दीत ऑलिम्पिक सारख्या मानाच्या स्पर्धेचं यजमानपद मिळवून दाखवलं.. आणि आम्ही आमच्या टुकार आयपीएल सारख्या स्पर्धा भरविण्यातच धन्यता मानत आहोत. हिटलरने जर्मनीला एक नवी ओळख दिली.. शिस्त काय असते हे जर्मनीकडून शिकावं... फक्त त्याच्या छोट्याशा कारकिर्दीमध्ये त्याने जर्मनीला विकसित राष्ट्राच्या पंगतीत नेऊन बसवंल. खरचं म्हणावसं वा़टतं "हाईल हिटलर!!!!!"