चंदेरी दुनियेत एक नजर

बदाम राणी गुलाम चोर या फिल्ममध्ये मुक्ता बर्वे, आनंद इंगळे, उपेंद्र लिमये, पुष्कर श्रोत्री या चौकडीने केलेय फुल टू धमाल...सतीश राजवाडेच्या या नव्या सिनेमात पेन्सिल झालेल्या मुक्ता बर्वेला कोण जिंकतं या भोवती या चित्रपटाचं कथानक फिरतंय. तर काय आहे हाऊसफुलमध्ये आणि आखणी काही बरचं. चंदेरी दुनियेतील ही सफर.

Updated: Jun 14, 2012, 02:35 PM IST

 www.24taas.com, मुंबई

 

बदाम राणी गुलाम चोर या फिल्ममध्ये मुक्ता बर्वे, आनंद इंगळे, उपेंद्र लिमये, पुष्कर श्रोत्री या चौकडीने केलेय फुल टू धमाल...सतीश राजवाडेच्या या नव्या सिनेमात पेन्सिल झालेल्या मुक्ता बर्वेला कोण जिंकतं या भोवती या चित्रपटाचं कथानक फिरतंय. तर काय आहे हाऊसफुलमध्ये आणि आखणी काही बरचं. चंदेरी दुनियेतील ही सफर.

 

हाऊसफुल टू मधून झळकलेली जॅकलीन सद्या फारच बिझी आहे. तिच्याकडे दोन इंटरनॅशनल फिल्म्स असल्यामुळे सध्या तिचं विमान हवेत आहे. एका श्रीलंकन सिनेमात ती काम करतेय जी यावर्षीच रिलीज होणार आहे. तर डेफिनिशन ऑफ फिअर ही दुसरी फिल्म पुढील वर्षी रिलीज होणार आहे

गँग ऑफ वासेपूरमध्ये माफिया लीडर झालेला मनोज वाजपेयी त्याच्या फिल्मबद्दल फारच एक्सायटेड आहे..निगेटिव्ह भूमिका मनोजने याआधीही साकारल्या पण आता बॉलिवूडमध्ये हिरो आणि व्हिलन ही सीमारेषा नष्ट झालेय असं त्याचं म्हणणं आहे.

'झलक दिखला जा' या डान्स रिएलिटी शोमध्ये अभिनेत्री इशा शर्वाणी आपल्या डान्सचा जलवा दाखवायला सज्ज झालीय..तिचा कोरिओग्राफर आहे सलमान...सलमान आणि ईशा या जोडीने जजेसना सरप्राईझेस देऊन थक्क करायचं ठरवलंय.

 

स्मॉल स्क्रीनच्या तारका यावेळी अवतरल्या नाशिकच्या भूमीवर...खास नाशिककरांना भेटायला....उत्सव नात्यांचा या कार्यक्रमात प्रेक्षकांच्या लाडक्या मंजिरी, कुहू, प्राची आत्या भेटल्या त्यांच्या चाहत्यांना आणि मग काय रंगली गप्पांची अनोखी मैफल...

 

'एका लग्नाची दुसरी गोष्ट' या मालिकेतल्या घडामोडींना आता वेग आलाय.. नाही नाही म्हणता म्हणता घना आणि राधा एकमेकांच्या प्रेमात तर पडलेत.. एकमेकांचा विरह त्यांनाही सहन होत नाहीए.. आणि त्यातच अबीरच्या येण्यामुळे मालिकेत आणखीनच रंगत आलीय.

 

गौरव महाराष्ट्राचा या सांगितिक रिएलिटी शोमध्ये या आठवड्यातही स्पर्धकांनी बहारदार गाणी सादर केलीयेत. छोट्यांची ही मोठी मैफल दिवसेंदिवस रंगत चाललेय.

 

महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात मंगळवारी सादर झाले बहारदार परफॉर्मन्स.. मग ते पारंपरिक तारपा नृत्य असो ,किंवा धनगर नृत्य असो, कलाकारांनी सादर केली महाराष्ट्राची अनोखी परंपरा

 

 डिपार्टमेंट फ्लॉप झाल्यामुळे राणा दुगबट्टीचं करियर धोक्यात आलंय..पण राणाला मात्र यश मिळवण्याची घाई नाहीए..निवडक सिनेमात झळकून बॉलिवूडमध्ये ठसा उमटवायचा असं त्यानं ठरवलंय..त्यामुळे सध्या तरी त्याला चांगल्या ऑफरसाठी वाट पाहावी लागतेय.

 

 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x