www.24taas.com, मुंबई
'यडूकेशन' हे नवं कोरं नाटक लवकरच रंगभूमीवर येत आहे. नावावरुन नाटकाचा विषय काय असेल कळत नाहीए ना? एकांकिका हे व्यावसायिक नाटक आणि मराठी सिनेमात एन्ट्री घेण्यासाठी असलेलं हक्काचं व्यासपीठ.
कॉलेजच्या या एकांकिकांमधूनच रंगभूमीला, मराठी सिनेमाला कसदार अभिनेते आणि अभिनेत्री मिळाल्या आहेत. आजवर अनेक सशक्त एकांकिकेवर व्यावसायिक नाटकं रंगभूमीवर आली आहेत. आणि आता असंच एक नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येतं आहे. 'यडूकेशन' असं या नाटकाचं नाव आहे.
सवाई एकांकिका स्पर्धेत गाजलेली ही एकांकिका लवकरच व्यावसायिक रंगभूमीवर दाखल होणार आहे. एकांकिकेच व्यावसायिक नाटकात रुपांतर करण्यासाठी नाटकाच्या अंकातही काही बदल करण्यात आले आहेत. शिक्षण पद्धती आणि ग्रामीण भागातील शाळांवर या नाटकातून उपहासात्मक भाष्य करण्यात आलं आहे. पहिला अंक नव्याने लिहिण्यात आला आहे.
मराठी सृष्टीतले अनेक कलाकार एकांकिकेच्या शालेय शिक्षण ही देशाचा सुसंस्कृत नागरिक घडवण्याची पहिली पायरी. मात्र, आज आपल्या देशात अनेक मुलं या शालेय शिक्षणापासून वंचित आहेत. तर काही ठिकाणी शाळा असून शिक्षक नाहीत. इतकंच कशाला तर दहावी फ, शिक्षणाच्या आयचा घो आणि नाटकांमधून भाष्य करण्यात आलं आहे.