श्रीकांत मोघे नाट्य संमेलनाचे अध्यक्ष

भारतीय नाट्य संम्मेलन आणि वाद यांच जन्माजन्मतरींच नातं असलं पाहिजे असेच म्हंटलं पाहिजे. कारण की, आज अखिल भारतीय नाट्य सम्मेलनाच्या अध्यक्षांची वादविवादामध्येच निवडप्रकिया पूर्ण झाली. 92 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीकांत मोघे यांची निवड करण्यात आली.

Updated: Nov 28, 2011, 09:17 AM IST

झी 24 तास वेब टीम, सांगली

 

भारतीय नाट्य संम्मेलन आणि वाद यांचं जन्मजन्मातरींच नातं असलं पाहिजे असेच म्हंटलं पाहिजे. कारण की, आज अखिल भारतीय नाट्य सम्मेलनाच्या अध्यक्षांची वादविवादामध्येच निवडप्रकिया पूर्ण झाली. 92 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीकांत मोघे यांची निवड करण्यात आली.

 

सांगलीत जानेवारीत हे नाट्य संमेलन होणार आहे. वा-यावरची वरात, तुझं आहे तुझपाशी, अश्वमेध, लेकुरे उदंड जाहली अशा अनेक नाटकातून त्यांच्या भूमिका गाजल्या. जवळपास 80 नाटकांमधून त्यांनी काम केली. कॉलेजमध्ये असल्यापासूनचं ते रंगभूमीकडं वळाले.

 

येत्या जानेवारीत सांगलीत हे नाट्यसंमेलन होत. मात्र तत्पूर्वी आज पार पडलेल्या या अक्ष्यक्षपदाच्या निवडी बैठकीमध्ये थोडी खडाजंगी झाली. या बैठकीत मोहन जोशी, स्मिता तळवलकर, वंदना गुप्ते, हेमंत टकले, विनय आपटे, उपस्थित होते....मात्र सहा नाट्यपरिषदांनी मोघेंना पाठिंबा दिल्यानं त्यांची निवड निश्चित होती. निवडीनंतर श्रीकांत मोघेंनी झी 24 ताससोबत आपल्या भावना व्यक्त केल्या.