www.24taas.com, वॉशिंग्टन
भारतात येण्याआधी परदेशात सनी लियोनची ओळख पॉर्नस्टार म्हणून अशीच आहे. मात्र, आपली इमेज बदलण्यासाठी सनी लियोन प्रयत्नशील आहे. ती आता हिंदी चित्रपट सृष्टीत आपले नशीब अजमावते आहे. तिचा 'जिस्म -२' हा चित्रपट येत आहे. त्याआधी ती बिग बॉसमध्ये दाखल झाली होती. त्यानंतर ती भारतात प्रसिद्धीच्या झोतात आली. पॉर्नस्टार आधी सनी कोण होती, याची माहिती आता उपलब्ध झाली आहे. मूळची भारताची आणि कॅनड राहणारी सनी सुरूवातीला नर्सिंगचे प्रशिक्षण घेत होती. त्यानंतर ती पॉर्नस्टार झाली.
सनीच्या आईवडिलांनी आपल्या मुलीचे नाव कॅथलिक शाळेत घातले होते. कारण शीख परिवात वाढल्यामुळे पब्लिक स्कुलमध्ये सनीला अडचणी येतील असा विचार तिच्या आईवडिलांनी केला होता. सनी १५ वर्षांची असतांना तिने पहिला जॉब एका जर्मन बेकरीमध्ये केला होता. मात्र, पेंटहाऊस मॅग्झिनचा फोटोग्राफर जे एलेनला भेटण्यापूर्वी सनी लियोनने ऑरेंज काऊंटीमध्ये नर्सिंगचे प्रशिक्षण घेत होती.
प्लेबॉय मॅग्झिनचे वाईस प्रेसिडेंट एरिक्सनबरोबर सनीच्या अफेअरच्या बातम्या होत्या. आता हे दोघेही वेगळे झाले असले तरीदेखील यांची मैत्री आजही कायम आहे. पॉर्नोग्राफिक चित्रपटांसाठी कॉन्ट्रॅक्ट करण्यापूर्वी फक्त महिलांबरोबरच परफॉर्म करणार अशी सनी अट घालत असते. त्यानंतर तिने याला फाटा दिला आणि बिनधास्त काम करू लागली. तिची ओळख आता पॉर्नस्टार अशी आहे.
२००४ मध्ये टीनएजर्ससाठी आलेल्या 'द गर्ल नेक्स्ट डोअर' या चित्रपटात सनीने अभिनय केला होता. २००४मध्ये बुश विरोधी अभियानाचे समर्थन करतांना सनीने एंजेल कासिडी, लिसा बोएलबरोबर अन्य लोकप्रिय पोर्न एक्ट्रेसबरोबर आपल्या शरीरावरील केसांवर वस्तरा चालवला होता. त्यामुळे ती अधिकच चर्चेत आली. सनीने २००५ मध्ये एमटीव्ही इंडियाच्या रेड कार्पेटवर रिपोर्टरची भूमिका साकारली होती.
सनीला तिचा दुसरा चित्रपट 'व्हर्चुअल विविज गर्ल सनी लियोन'साठी पहिला एवीएन अवॉर्ड मिळाला होता. या अवॉर्डला ऑस्कर ऑफ पॉर्न बी या नावानेही ओळखले जाते. २०१०मध्ये सनीच्या नावाचा समावेश 'मॅक्सिम' मॅग्झिनच्या टॉप १२ फिमेल स्टार्समध्ये झाला होता. आता तर ती भारतात आपले नशिब अजमावत आहे. तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश करून धकामा उडवून देण्याचा सपाटा लावला आहे. तिचे 'जिस्म -२'चे फोटो आणि गाणे हॉट होत आहेत.