झरीनवर दौलतजादा, तोडला कराराचा वायदा

दिल्लीतील अशाच एका समारंभात परफॉर्मन्ससाठी गेलेल्या झरीन खानने मात्र तो अर्धवट सोडत काढता पाय घेतला. झरीन खानचं परफॉर्मन्स ऐन रंगात आला असताना एकाने तिच्याशी गैरवर्तन केलं आणि त्यामुळेच ती संतापाने निघून गेली.

Updated: Feb 24, 2012, 11:09 AM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

 


दिल्ली धनिकांच्या समारंभांमध्ये बॉलिवूडच्या सेलिब्रिटीजनी हजेरी लावून परफॉर्मन्स सादर करणं यात काही नाविन्य उरलेलं नाही. बॉलिवूड सेलिब्रिटीजच्या परफॉर्मन्ससाठी वाटेल ती किंमत मोजायची या धनिकांची तयारी असते.

 

दिल्लीतील अशाच एका समारंभात परफॉर्मन्ससाठी गेलेल्या झरीन खानने मात्र तो अर्धवट सोडत काढता पाय घेतला. झरीन खानचं परफॉर्मन्स ऐन रंगात आला असताना एकाने तिच्याशी गैरवर्तन केलं आणि त्यामुळेच ती संतापाने निघून गेली.

 

दिल्लीतील तिवोली गार्डनमधल्या एका पार्टीत परफॉर्म करण्यासाठी झरीनला तब्बल पाच लाख रुपये देण्यात आले होते. या पार्टीला हजर असणाऱ्या एका सूत्राने सांगितलं की झरीन स्टेज परफॉर्म करत असताना एकाने तिच्यावर दहा हजार रुपयांची दौलतजादा केली प्रत्येक नोटेची उधळण होत असताना उपस्थित शिट्ट्या वाजवत होते.

 

झरीनने या प्रकारला जोरदार हरकत घेतली आणि परफॉर्मन्स थांबवला. त्यामुळे कार्यक्रम आयोजीत करणाऱ्यांमध्ये, इव्हेंट मॅनेजमेंट फर्म आणि झरीनमध्ये मोठा वाद झाला. पण झरीनने घेतलेले पैसे परत करायला नकार दिला. अखेरीस इव्हेंट मॅनेजर्सनी मदतीसाठी पोलिसांना १०० नंबर फिरवला. वसंत कुंज पोलिस स्टेशनमधील अधिकाऱ्यानुसार संध्याकाळी इव्हेंट मॅनेजर्सची भेट पोलिसांनी घेतली, पण त्यांनी याबातीत काहीही कारवाई करण्यास नकार दिला. याबाबतीत झरीनने या सगळ्याचं खापर इव्हेंट मॅनेजर्स डोक्यावर फोडलं.