सुश- द सिरीयल लव्हर

प्रेमाला उपमा नाही ते देवाघरचं देणं असं म्हणतात पण सुश्मिता सेनच्या प्रेम प्रकरणांच्या यादीवर खुद्द भगवंताने नजर टाकली तर त्याला सुध्दा भोवळ येईल. या बाईची प्रेम प्रकरणं हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय होऊ शकतो. सुश्मिता सेन ही एक सिरीयल लव्हर आहे.

Updated: Dec 27, 2011, 05:38 PM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई 

 

प्रेमाला उपमा नाही ते देवाघरचं देणं असं म्हणतात पण सुश्मिता सेनच्या प्रेम प्रकरणांच्या  यादीवर खुद्द भगवंताने नजर टाकली तर त्याला सुध्दा भोवळ येईल. या बाईची प्रेम प्रकरणं हा  एक स्वतंत्र संशोधनाचा विषय होऊ शकतो. सुश्मिता सेन ही एक सिरीयल लव्हर आहे.

 

आता वयाची पसतीस ओलांडल्यावर तिने इमतियाझ खत्री नावाच्या धनाढ्य उद्योजक बरोबर  सूत जुळवलं आहे. आता हे किती दिवस चालेल ते पाहायचं आणि सुश्मिताचे बेफाम वागणुकीने  त्याच्या नाकावर सूत धरण्याची पाळी येऊ नये म्हणजे मिळवलं. काही दिवसांपूर्वी गोव्यातील इंडिया रेझॉर्ट फॅशन वीकमध्ये सुश्मिता बरोबर इमतियाझ रॅम्पवर चालला. त्यानंतर मुंबईतील अनेक पार्ट्यांमध्ये ते एकत्र दिसले.

 

आता मीडियासमोर सुश्मिता बरोबर आपली रिलेशनशीप असल्याचं इमतियाझ कबूल करायला लाजत नाहीये आणि सुश्मिता सेनने लाज कधीच सोडली आहे त्यामुळे प्रश्नच नाही. आपण सुश्मिता सोबत पार्टीजना गेलो होतो पण मित्रमंडळीही सोबत होती इति इमतियाझ...सुश्मिता आणि मी फक्त चांगले मित्र हे नेहमीच घासून गुळगुळीत आणि हजार वेळा ऐकलेलं वाक्य इमतियाझने म्हटलं नसल्यास नवलचं म्हणायचं. आम्ही वरचेवर एकमेकांच्या संपर्कात नसतो कारण ती तिच्या कामात व्यस्त असते असं इमतियाझ म्हणणं आहे. जाता जाता आजवर सुश्मितासोबत प्रेमरंग उधळलेल्यांचा सल्ला इमतियाझने घेतल्यास त्याला लवकर शहाणपण येईल.  इमतियाझ म्हणतो की लोगों का काम है कहना... खरे आहे बाबा पण तू कामातून जाणार नाहीस एवढी काळजी घे म्हणजे झालं.