2012च्या आर्थिक सर्वेक्षणाची वैशिष्ट्ये

२०१२-१३ आर्थिक वर्षामध्ये जीडीपी दर ७.६ टक्के तर २०१३-१४मध्ये जीडीपी विकास दर ८ टक्के राहिल, असा अंदाज केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज जाहीर केले. केंद्र सरकारतर्फे २०१२-१३चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सादर केला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

Updated: Mar 15, 2012, 07:23 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

२०१२-१३ आर्थिक वर्षामध्ये जीडीपी दर ७.६ टक्के तर २०१३-१४मध्ये जीडीपी विकास दर ८ टक्के राहिल, असा अंदाज केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज जाहीर केले. केंद्र सरकारतर्फे २०१२-१३चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सादर केला. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

 

कृषी क्षेत्र आणि सेवा क्षेत्रातील वृद्धी चांगली असून २०१२च्या आर्थिक वर्षात कृषी क्षेत्रात २.५ टक्के वृद्धी राहिल तर सेवा क्षेत्रातील वृद्धी ९.४ टक्के राहण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. औद्योगिक विकासामध्ये वृद्धी होत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. आर्थिक वर्ष २०१२-मध्ये आयआयपीमधील वाढ  ४ ते ५ टक्के राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे महागाई दरात घट होण्याचे संकेत सरकारने दिले असून महागाईवर नियंत्रण आणणं हे प्रमुख उद्दिष्ट राहिल. २०१२ या आर्थिक वर्षात महागाई दर ६.५ ते ७ टक्के राहिल, असे आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे.

 

आर्थिक वर्ष २०१२-१३मध्ये आर्थिक घट होणाच्या अनुमान आहे. त्यामुळे ही आर्थिक घट लवकरात लवकर कमी करण्याची गरज आहे, असं सरकारने नमूद केले आहे. २०१३ आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल, अशी आशा आहे. तसंच रुपयामधील उतार-चढावावर ठोस पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक महिन्यांच्या आकड्यांच्या आधारावर रुपयामध्ये १२.४ टक्के घट झाली आहे.

 

 

सरकारच्या मते, अर्थव्यवस्थेत झपाट्याने वाढ होण्यासाठी जमीन अधिग्रहणाचा मुद्दा फारच महत्त्वाचा आहे. मल्टिब्रॅण्ड रिटेल क्षेत्रामध्ये एफडीआयच्या मंजुरीमुळे बांधकाम उद्योगाच्या वृद्धीमध्ये वाढ होण्यासाठी मदत मिळेल. आर्थिक वर्ष २०१२च्या पहिल्या सहामाही निर्यातीमध्ये ४०.५ टक्के वाढला तर आयातीचा दर ३०.४ टक्के होता. त्याचबरोबर व्यापारामध्ये ३ टक्के घट सुरु असल्याने चिंता वाढली आहे.

 

 

इराणमधील तेल संकटामुळे तेलाची पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तेलाच्या किंमतीमध्ये वाढ होऊ शकते. पण कच्चा तेलाचे वाढते दर जीडीपी वाढीसाठी धोकादायक ठरु शकतात, असेही यात नमूद केले आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये अर्थव्यवस्थेला पुन्हा प्रगती पथावर आणण्यासाठी आणखी काही मार्ग शोधण्याचे प्रयत्न सुरु आहे, असं इकॉनॉमिक सर्व्हेवर आपली प्रतिक्रिया देताना अर्थमंत्री प्रणव मुखर्जी म्हणाले. पण आता कोणताही निर्णय झालेला नाही आणि यासाठी चर्चेची आवश्यकता असल्याचं त्यांनी म्हटलं.

Tags: