अण्णांच्या आंदोलनासाठी चोख सुरक्षा व्यवस्था

अण्णांच्या उपोषणामुळे MMRDA मैदानाला छावणीचं स्वरुप आलंय. आंदोलना दरम्यान चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे. आंदोलना ठिकाणी काही वस्तू नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

Updated: Dec 26, 2011, 08:42 PM IST

झी 24 तास  वेब टीमसाठी- दिनेश मौर्या

अण्णांच्या उपोषणामुळे MMRDA मैदानाला छावणीचं स्वरुप आलंय. आंदोलना  दरम्यान चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनानं जय्यत तयारी  केली आहे. आंदोलना ठिकाणी काही वस्तू नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.

अण्णांच्या आंदोलनात सुरक्षेचं महत्त्व लक्षात घेता पोलिसांनी चांगलीच कंबर कसली आहे. वांद्र्याच्या MMRDA मैदानाला पोलिसांचा वेढा पडला आहे.  आंदोलनासाठी दोन हजारांपेक्षा जास्त पोलीस, 200 पेक्षा जास्त पोलीस उपनिरीक्षक, SRPF च्या सहा तुकड्या, अँटी टेरर स्क्वॉड तसंच शीघ्र कृती दलाच्या तीन तुकड्या MMRDA वर सज्ज आहेत.

अण्णांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयबीनं मुंबई पोलिसांना अलर्ट राहण्याचा इशारा दिला आहे. सुरक्षेच्या कारणामुळे प्लॅस्टिकच्या पिशव्या आंदोलनाच्या ठिकाणी नेण्यास बंदी घालण्यात आलीय. दिनांक 27, 28 आणि 29 असे तीन दिवस हे आंदोलन होणार आहे. त्यामुळे हे तीन दिवस सुरक्षा व्यवस्थेसमोर मोठं आव्हान असणार आहे.

Tags: