अण्णांना नोटीस

ट्रस्टमधील निधीचा गैरव्यवहार झाल्याच्या कथित आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना नोटीस पाठविली आहे.

Updated: Nov 5, 2011, 01:28 PM IST

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाने आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना नोटीस पाठविली आहे.

 

हिंद स्वराज ट्रस्टमधील निधीचा गैरव्यवहार झाल्याच्या कथित आरोपावरून अण्णांसह केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि सीबीआयला सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठविली आहे. गैरव्यवहाराच्या मुद्‌द्‌यावरून एम. एल. शर्मा यांनी न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीनंतर न्यायालयाने ही नोटीस बजावली आहे.

 

अण्णा हजारे यांनी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी ट्रस्टमधील 2.2 लाख रुपयांचा दुरुपयोग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कॉंगेसनेही यापूर्वी अण्णांवर या निधीच्या गैरवापराचा आरोप केला होता. मात्र, त्यावेळी कोणताही आरोप सिद्ध न झाल्याने अण्णांविरुद्ध कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नव्हती.