कलमाडी २०१४ ची लोकसभा लढवणार

राष्ट्रकुल स्पर्धेत घोटाळ्याचा ठपका असलेले सुरेश कलमाडी पुण्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होणार आहेत.२०१४ ची लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं कलमाडींनी सांगितल. पण कॉमनवेल्थ घोटाळ्यात भरपूर गोलमाल करणा-या कलमाडींना काँग्रेस आणि पुण्याची जनता कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Updated: Mar 9, 2012, 11:21 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

राष्ट्रकुल स्पर्धेत घोटाळ्याचा ठपका असलेले सुरेश कलमाडी पुण्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय होणार आहेत.२०१४ ची लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचं कलमाडींनी सांगितल. पण कॉमनवेल्थ घोटाळ्यात भरपूर गोलमाल करणा-या कलमाडींना काँग्रेस आणि पुण्याची जनता कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पुण्याचा एके काळचा सबसे बडा खिलाडी पुन्हा राजकारणात सक्रिय होणार आहे. लोकसभेची २०१४ची निवडणूक लढवणार असल्याचं कलमाडींनी स्पष्ट केलं आहे. कोर्टात निर्दोषत्व सिद्ध होईल, असा दावा कलमाडींनी केलाय. पुण्याचे प्रश्न आणि राजकीय मुद्द्यांवर कधी बोलणार, या प्रश्नावर कलमाडींनी संसदेच्या अधिवेशनापर्यंत थांबा, असं उत्तर दिलं आहे.

२०१४ची निवडणूक लढवण्याचा कलमाडी दावा करत असले तरी सध्या कलमाडींचे पक्षांतर्गत विरोधक आक्रमक झालेत, त्यामुळे कलमाडींना काँग्रेस तिकीट देणार का, हा मोठा प्रश्न आहे. त्याचबरोबर कलमाडी जरी निर्दोष सुटले तरी पुणेकर त्यांना माफ करणार का, हे लक्षात घेणंही महत्त्वाचं आहे. सध्या पुण्यात नंबर वन ठरलेल्या राष्ट्रवादीही आणखी जागांवर दावा सांगून कलमाडींची कोंडी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पुण्याचं मैदान पुन्हा गाजवण्यासाठी सज्ज झालेल्या कलमाडींसाठी पुढचा प्रवास नक्कीच सोपा नाही.