चिंतनला अमेरिकेचे फर्स्ट इनोव्हेशन ऍवार्ड

भारतीय स्वंयसेवी संस्था चिंतनची निवड अमेरिकेच्या फर्स्ट इनोव्हेशन ऍवार्डसाठी करण्यात आली आहे. महिला आणि मुलींचे सक्षमीकरण तसंच कचरा गोळा करणाऱ्यांना प्रशिक्षण आणि संघटना तसंच कचरा गोळा करण्याच्या कामातून बाल मजुरांची मुक्तता याकामासाठी चिंतनची निवड करण्यात आली आहे.

Updated: Mar 8, 2012, 12:14 PM IST

www.24taas.com, वॉशिंगटन
भारतीय स्वंयसेवी संस्था चिंतनची निवड अमेरिकेच्या फर्स्ट इनोव्हेशन ऍवार्डसाठी करण्यात आली आहे. महिला आणि मुलींचे सक्षमीकरण तसंच कचरा गोळा करणाऱ्यांना प्रशिक्षण आणि संघटना तसंच कचरा गोळा करण्याच्या कामातून बाल मजुरांची मुक्तता याकामासाठी चिंतनची निवड करण्यात आली आहे. अमेरिकेच्या रॉकफेलर फाऊंडेशनने इनोव्हेशन ऍवार्ड पुरस्कृत केला आहे.

 

अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन या पुरस्काराची अधिकृत घोषणा करतील. जगभरात महिला आणि मुलींच्या जीवनात परिवर्तना घडवणाऱ्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना हा पुरस्कार पाठबळ पुरवतो. चिंतनने तळागाळात काम उभारलं असून कचरा गोळा करणाऱ्यांसाठी प्रशिक्षण तसंच प्लास्टिक रिसायकलिंग, बाल मजुरीचे निर्मुलन या कार्यात महत्वपूर्ण योगदान दिलं आहे.

 

चिंतनच्या संस्थापिक भारती चतुर्वेदी यांनी घनकचरा व्यवस्थापन आणि कचरा पुर्नवापर प्रक्रिया या क्षेत्रात काम केलं आहे. भारती चतुर्वेदी धोरण आखणी संदर्भात सरकारच्या अनेक समित्यांवर काम पाहतात. चतुर्वेदी यांना २००९ साली जॉन हॉपकिन्स अल्युमनीचं क्नोलेज फॉर द वर्ल्ड ऍवार्ड देण्यात आलं होतं. या पुरस्काराच्या निवड समितीवर बांग्लादेश ग्रामीण बँकेचे मोहम्मद युनूस आणि चेरी ब्लेअर फाऊंडेशनच्या चेरी ब्लेअर यांनी काम पाहिलं.